HW News Marathi
महाराष्ट्र

शिवसेना मोठी होण्यात माझा मोठा वाटा आहे!

मुंबई | केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना काल(२४ ऑगस्ट) जमीन मिळाली आहे. नारायण राणे यांना मुंबई हायकोर्टाकडून दिलासा, राणे यांच्या याचिकेवर सुनावणी सुरु होती, दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकल्यानंतर हायकोर्टाने नाशिकच्या गुन्ह्या प्रकरणी कोणतेही कठोर कारवाई करु नये, असा आदेश दिला आहे. पण पुण्याच्या गुन्ह्याबाबत दिलासा मिळालेला नाही. या प्रकरणाची पुढील सुनावणी १७ सप्टेंबरला असणार आहे. त्यांचं मत मांडण्यासाठी आज(२५ ऑगस्ट) त्यांनी पत्रकार परिषद घेतली.

शिवसेनेला मोठं करण्यात माझा हात मोठा

नारायण राणे यांनी आज(२५ ऑगस्ट ) पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना त्यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. यावेळी बोलताना नारायण राणे यांनी “शिवसेना मोठं करण्यात माझा मोठा हात आहे”, असं विधान त्यांनी केलं आहे. “शिवसेना जव्हा स्थापन होत होती तेव्हा माझा सगळ्यात मोठा हात होता. आताचे जे शिवसैनिक आहेत ते कुठे दिसत आहेत? मी कर्तृत्ववान आहे म्हणून मी आज इथे आहे, शिवसेनेचे नेते का नाही दिसत कुठे?”, असं नारायण राणे म्हणाले आहेत.

कसला पराक्रम?

शिवसैनिकांनी काल(२४ ऑगस्ट) नारायण राणेंच्या बंगल्याबाहेर आंदोलन केलं होतं. त्यालाच प्रत्युत्तर आजच्या परिषदेत नारायण राणेंनी केलं आहे. ते म्हणाले, “कसला पराक्रम करून आलेत हे, उलट मार खाऊन आलेत. त्यातली १२ जन आता दवाखान्यात ऍडमिट आहेत. हाच का तुमचा पराक्रम? हा पराक्रम केल्यावर तुम्हाला तुमच्या साहेबांकडून शाबासकी मिळाली असेल. त्यांना कितीही आंदोलनं करायची आहेत ती करू द्यात. मी घाबरत नाही. कितीही मोर्चे काढायचे आहेत ते काढू द्या, पोलिस त्यांच्या कडे लक्ष देताच आहेत, आम्ही कायद्याने चालणारी माणसं आहोत कायद्यानेच वागू”, असं ते म्हणाले आहेत.

काही चॅनेल त्यांना वाचवण्याची सुपारी घेत आहेत

पत्रकार परिषद चालू असताना, नारायण राणे यांनी पत्रकारांवर देखील हल्ला चढवला आहे. “काही चॅनेल्सनी त्यांना वाचवण्याची सुपारी घेतली आहे”, असं नारायण राणेंनी सांगितलं आहे. याआधीही नारायण राणे यांनी पत्रकारांवर निशाणा साधला आहे. ” मी आता काहीच वक्तव्य करणार नाही. कारण मी काही बोलो तर लेगच चॅनेल वाले ते टाकतील आणि त्याची बातमी बनेल. पण या आधी जे गेलं त्यावर माझा आक्षेप नाही”, असं नारायण राणे म्हटले आहेत.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भंडाऱ्याच्या घटनेची योग्य चौकशी करुन सरकार दोषींवर कारवाई करेल, रोहित पवारांचा विश्वास

News Desk

…आता सर्व विद्यापीठ पदवी वितरण घोटाळ्याचे महाकाव्य केंद्र बनतील! – देवेंद्र फडणवीस

Aprna

#MaharashtraElections2019 : नक्षलवादाला न जुमानता गडचिरोलीत ५२ टक्के मतदान

News Desk