HW News Marathi
महाराष्ट्र

‘तेव्हा बाळासाहेबांनी पहिला फोन मला केला’, नारायण राणेंनी दिला आठवींना उजाळा!

सिंधुदुर्ग। केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जनआर्शिवाद यात्रेचा आज(29 ऑगस्ट) शेवटचा दिवस आहे. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेतली. नारायण राणे आणि शिवसेनेतील वाद काही केल्या थांबताना दिसत नाही. दररोज दोन्ही बाजूनं एकमेकांवर टीकेची झोड उठवली जात आहे. यातच आज नारायण राणे यांनी शिवसेनेच्या जडणघडणीमध्ये केलेल्या कामाची आठवण शिवसेनेला करुन दिली. ते कणकवलीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

पण हे सारं बाळासाहेबांवरील प्रेमापोटी आम्ही केलं

नारायण राणे आधी शिवसैनिक होते आणि मग ते आता भाजप मध्ये आहेत . पत्रकार परिषदेत त्यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या एका किस्याला उजाळा दिला आहे. “शरद पवारांनी बाळासाहेबांना फोन करुन मातोश्री सोडण्याचा सल्ला दिला होता. दहशतवादी हल्ल्याची शक्यता वर्तवली होती. तेव्हा बाळासाहेबांनी पहिला फोन मला केला होता आणि नारायण जसा असशील तसा निघून ये असं सांगितलं. मी जिथं जाईन तिथं माझ्या पुढे आणि मागे तुझ्या गाड्या असल्या पाहिजेत अशी जबाबदारी मला दिली होती. बाळासाहेब तेव्हा काही दिवस अज्ञातवासात होते आणि त्यांना मी सुरक्षा देत होतो. त्यांच्या सुरक्षेसाठी मी १५ दिवस अंघोळ वगैरे न करता.. जे मिळेत खाऊन आणि गाडीतच झोपत होतो. रात्रभर मच्छरांचा त्रास सहन करत होतो. पण हे सारं बाळासाहेबांवरील प्रेमापोटी आम्ही केलं होतं”, असं नारायण राणे म्हणाले आहेत.

अजित पवार अजून अज्ञान आहेत

नारायण राणे यांनी या जनाशीर्वाद यात्रेत सरकारवर टीका केली आहे. यावेळी बोलताना त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर देखील निशाणा साधला आहे. नारायण राणे यांनी अजित पवार यांच्या टिकेचा समाचार घेतला. ‘अजित पवार अजून अज्ञान आहेत. आपल्या खात्याचं बघा. अजून मी राष्ट्रवादीकडे अद्याप वळलेलो नाही, असा इशारा नारायण राणे यांनी दिला आहे. ‘आपल्यावरील आरोप किंवा केसेस कशा काढायच्या हे अजित पवारांकडून शिकलं पाहिजे,’ असेही ते म्हणाले आहेत.

निधी द्यायचं बोललं तर गडकरी साहेबाचं मंत्रालय देऊ शकते,‘सूक्ष्म आणि लहानमध्ये काय निधी मिळणार आहे?. निधी द्यायचं बोललं तर गडकरी साहेबाचं मंत्रालय देऊ शकते. गडकरी साहेबांनी यापूर्वी निधी दिला आहे. कामे पण चालली आहेत. या खात्याचं पूर्वी नाव अवजड खातं होते. काही लोकं त्याला गंमतीने अवघड खातंही म्हणायचे. आता त्याच्या नावात काही बदल झाले आहेत.’ अशी टीका अजित पवार यांनी केली होती. तसेच ‘आता करोनाचं संकट आल्याने सुक्ष्म आणि लघू खूप सारे उद्योग अडचणीत आले आहेत. देशातील छोट्या उद्योगांसाठी एखादा निर्णय घेत येत असावा, असं वाटतं,’ असा टोलाही पवारांनी लगावला होता.

आता हे सर्व बस्स करा

नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन शिवसेना आणि संजय राऊतांवर निशाणा साधला आहे. मी शेवटी एवढेच म्हणेल की आता हे सर्व बस्स करा. जर संजय राऊत यांनी हे थांबवले नाही तर मी पण प्रहारमधून सुरु करेल. कोण कुठे बसतो, काय करतो याचा गौप्यस्फोट करेल, असा इशारा राणे यांनी दिला. अनिल परब कितीही लपून काहीही करत असले तरी त्यांचे कारनामे कॅमेऱ्यावर आले आहेत, असंही त्यांनी सांगितलं आहे.

एक मांजर आडवी आली. मात्र मी त्याकडे लक्ष देत नाही

या दौऱ्यामध्ये अपशकुन आले. एक मांजर आडवी आली. मात्र मी त्याकडे लक्ष देत नाही. त्यांनी सामनातून अग्रलेख लिहिले. आमच्या मुलावर बोलले. माझी दोन्ही मुलं चांगली आहेत. मात्र तुमच्या मुलांचे पराक्रम आधी बघा. मग आमच्यावर बोला, असा दमच राणेंनी भरला. तोंडावर भेटल्यावर चांगले बोलायचं. लेखणी हातात आली आणि वरुन फोन आला तर ये रे माझ्या मागल्या करायचं हे धंदे सोडा, असा टोला त्यांनी राऊतांना लगावला आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

दिवसरात्र आपले रक्षण करणाऱ्या पोलिस कॉन्सटेबलचीही आर्थिक मदत

News Desk

एसटीच्या प्रत्येक बसस्थानकावर “मराठी भाषा गौरव दिन” होणार साजरा

News Desk

अजित पवारांच्या ‘या’ भूमिकेमुळे पालिका निवडणुकीसाठी भाजप सतर्क

News Desk