HW Marathi
देश / विदेश महाराष्ट्र राजकारण

Exclusive | राज्यातही ‘ऑपरेशन लोटस’चे पंकजा मुंडेंनी दिले संकेत !

बीड | मध्य प्रदेशात ऑपरेशन लोटस यशस्वी झाल्याबद्दल मी सर्वांचे अभिनंदन केले आहे. शिंदेंच्या रुपाने मोठा ताकदवान नेता भाजपमध्ये आला आहे. ज्योतिरादित्य शिंदे यांची ही घरवापसी आहे. महाराष्ट्रात सुद्धा या सरकारचं ज्यापद्धतीने काम सुरू आहे, या सरकारच्या मनात आणि जनतेच्या मनात सरकारबद्दलच शंका आहे. त्यामुळे येत्या काळात महाराष्ट्रराज्यातदेखील भाजपचे ऑपरेशन लोटस होण्याचे  संकेत भाजपच्या मंत्री पंकजा मुंडे यांनी एच. डब्ल्यू. मराठीशी बोलताना दिले आहेत .मात्र, ऑपरेशन लोटस कधी होणार हे सांगितलं जात नसतं तर ते झाल्यानंतर सगळ्यांना कळणारच असे त्या म्हणाल्या.

तसेच भाजपला महाविकासआघाडी सरकार तोडायला अनेक वर्षे लागतील या धनंजय मुंडे यांच्या वक्तव्यावर त्या म्हणाल्या की, धनंजय मुंडे हे एका प्रादेशिक पक्षात काम करतात. त्यांना राष्ट्रीय पक्षाची भूमिका समजणार.दरम्यान त्यांच्याच पक्षात याआधीऑपरेशन लोटस झालं तेव्हा ते जागे नव्हते, आता सुद्धा ते झोपेत असताना ऑपरेशन लोटस होईल, असे स्पष्ट संकेत पंकजा मुंडे यांनी एच. डब्ल्यू. मराठीशी बोलताना दिले आहेत

पंकजा मुंडेंची मुलाखत

 

Related posts

आम्हाला बी टिम म्हणून हिणवणारे आता भाजपचे गुलाम !

News Desk

येत्या २४ फेब्रुवारीपासून राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सरू होणार

अपर्णा गोतपागर

अवकाळी पावसामुळे राज्यातील ३२५ तालुक्यांमध्ये तब्बल ५४ लाख हेक्टर शेतीचे नुकसान

News Desk