HW News Marathi
Covid-19

गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथीला गोपीनाथ गडावर गर्दी करू नका, पंकजा मुंडेंचे आवाहन

बीड | देशासह राज्यात कोरोनाने थैमान घातला आहे. या पार्श्वभूमीवर भाजप नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी भाजपचे जेष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांचा ३ जून रोजी सहावा पुण्यस्मरण दिवस आहे. हा दिवस ‘संघर्ष दिन’ म्हणून मुंडे समर्थक साजरा करतात. मात्र, सध्या राज्याची कोरोनाची परिस्थिती पाहात पंकजा मुंडेंनी गोपीनाथ मुंडे यांच्या समर्थकांना आवाहन केले आहे. “लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथीला मुंडे साहेबांच्या आवडीचा पदार्थ करायचा आणि घरातच फोटोसमोर दोन दिवे लावून त्यांना अभिवादन करायचे,” असे आवाहन पंकजा मुंडे यांनी केले आहे.

लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचा 3 जून रोजी सहावा पुण्यस्मरण दिवस आहे. हा दिवस ‘संघर्ष दिन’ म्हणून मुंडे समर्थक साजरा करतात. परंतु सध्या कोरोनामुळे राज्याl लॉकडाऊन आहे. शिवाय गर्दीच्या सर्वच कार्यक्रमावर बंदी आहे. गोपीनाथ गडावर सध्या पद्धतीने मोजक्या लोकांमध्ये गोपीनाथ मुंडे यांची पुण्यतिथी कार्यक्रम होणार आहे. पुण्यतिथीचा कार्यक्रम सोशल मीडियाद्वारे लाईव्ह होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी दर्शन घेण्यासाठी किंवा मला भेटण्यासाठी येऊ नका, असा संदेश पंकजा मुंडे यांनी दिला.

पंकजा मुंडे म्हणाल्या, २ जून रोजी बाबा घरी पोटभर रस-पोळी खाऊन गेले होते. स्वतःच्या घरी तेच त्यांचे अखेरचं जेवण. ३ जून रोजी त्यांचे पार्थिव देखील घरी आणता आले नाही. त्यामुळे ३ जून हा दिवस उजाडलाच नाही पाहिजे, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. ३ जून रोजी नागरिकांनी आपापल्या घरात मुंडे साहेबांचा फोटो समोर उभे रहा. उजव्या बाजूला घरातील महिला, तर डाव्या बाजूला पुरुष उभे राहतील. दोन समई किंवा दिवे लावून अभिवादन करा. मुंडे साहेबांच्या आवडीचा पदार्थ करा, तो काय हे मी सांगायची गरज नाही, असेही पंकजा मुंडे यांनी सांगितले. दुपारी १२ ते संध्याकाळी ६ या वेळेत अन्नदान, रक्तदान, मास्क किंवा औषधाचे वाटप करा, त्याचे फोटो माझ्या सोशल मीडियावर पाठवा, असे आवाहनही त्यांनी केले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

रेल्वेकडून ३० जूनपर्यंत सर्व बुकिंग रद्द, विशेष आणि श्रमिक रेल्वे धावणार

News Desk

भाजपला जडला महाराष्ट्राचा अवमान करण्याचा रोग !

News Desk

वंदे भारत अभियानांतर्गत महाराष्ट्रात आलेल्या नागरिकांची मुख्यमंत्र्यांनी दिली

News Desk