HW News Marathi
महाराष्ट्र

“खुश रहे तुम सदा ये दुवा है मेरी”, मुनगंटीवारांची भावनिक प्रतिक्रिया

मुंबई | भाजपचे नेते एकनाथ खडसे शुक्रवारी राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी याबाबत घोषणा केली आहे. तर स्वत: खडसेंनी देखील भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याचे सांगितले आहे. दरम्यान, यावर भाजप नेते सुधीर मुनगंटीवर यांनी प्रतिक्रिया देत ‘हो सके तो लौट के वापस आना’ अशी साद खडसेंना घातली आहे.

एका वृत्तवाहिनीशी बोलताना मुनगंटीवर म्हणाले, खडसेंनी जाऊ नये अस मनापासून वाटतं. त्यांचा हा पक्षप्रवेश भाजप पक्षासाठी धक्कादायक बाब आहे. खडसेंचे पक्षासाठी असलेले योगदान हे खूप मोठे आहे. त्यामुळे पक्षाने चिंतन करण्याची गरज आहे. ते अत्यंत जवळचे सहकारी होते. ‘हो सके तो लौट के वापस आना’ असे म्हणत खडसेंना मुनगंटीवार यांनी साद घातली आहे.

तसेच, खडसेंचा पक्षांतर्गत सुरु असलेला वाद संपेल असं मला वाटायचं, पण जे होतंय ते दुःखदायक आहे. खडसेंचा राजीनामा ही आमच्यासाठी निश्चितचं चिंतनाची बाब आहे. पण आता त्यांनी निर्णय घेतला आहे तर “खुश रहे तुम सदा ये दुवा है मेरी” हेच आम्ही म्हणू शकतो.” अशी भावनिक प्रतिक्रिया देखील त्यांनी यावेळी दिली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नगरपंचायत निवडणूक निकाल काँग्रेससाठी समाधानकारक! – नाना पटोले

Aprna

मुख्यमंत्र्यांसह सर्व लोकप्रतिनिधींच्या वेतनात ६० टक्के कपात

swarit

महाराष्ट्रात जरी आघाडीचं सरकार असलं तरी बाळासाहेब थोरातांना बळकट करायचे आहे, पृथ्वीराज चव्हाणांचे सुचक वक्तव्य

News Desk