HW News Marathi
महाराष्ट्र

HW Exclusive : लोकशाही विदाऊट मुख्यमंत्री आणि अध्यक्ष! – मुनगंटीवारांची सरकारवर टीका

मुंबई | ही लोकशाही विदाऊट मुख्यमंत्री आणि अध्यक्षआहे, हे गैर आहे, अशी खंत भाजपेचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी एचडब्ल्यू न्यूज मराठीशी बोलताना केले आहे. राज्याचे आज (२२ डिसेंबर) विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू झाले आहे. या पार्श्वभूमीवर विरोधकांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अनुपस्थितीवरून महाविकासआघाडी सरकारवर हल्लाबोल केला आहे. विधिमंडळात आज सकाळपासून मुख्यंत्र्यांच्या अनुपस्थितीवरून विरोधकांच्या निशाण्यावर आहेत. 

शरद पवारसाहेब जेव्हा परदेशात जायाचे, तेव्हा काही ना काही सोय करून जायचे. आपण इतर वेळेत ठिका आहे.  पण कमीत कमी अधिवेशनाच्या कालावधीमध्ये सर्व निर्णय हे मुख्यमंत्र्यांनाच घ्यावे लागते. आणि अशा काळात चार्ज न देने हे तर गैर आहे, असे जगात कुठेच घडत नाही हे फक्त महाराष्ट्रात पहिल्यांदा घडते. विधानसभेचे अध्यक्ष नाही आणि मुख्यमंत्री देखील नाही. म्हणजे बिना ड्रायव्हर आणि गैरच्या गाडीचा शोध अमेरिकेने शोध लावला. पण महाराष्ट्र पुढे आहे, ही लोकशाही विदाउट मुख्यमंत्री आणि अध्यक्ष आहे, हे गैर आहे. 

“केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आले होते यानंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी टीका केली होती,यावर एचडब्ल्यू मराठीच्या पत्रकारांनी प्रश्न विचारल्यावर मुनंगटीवार म्हणाले, ” त्यांनी काय म्हणाचे तो त्यांचा भाग आहे. ये पब्लिक है सब जानती है अमित भाईचे म्हणाले ते खरे आहे ना, तुम्ही आमच्यासोबत निवडून आले ना. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या विरोधात आयुष्यभर स्व. बाळासाहेब ठाकरेंनी ऐल्गार केला. यावेळी मुनंगटीवारांनी बाळासाहेबांचा आठवणी करत त्यांच्या मुलाखतीचा किस्सा सांगितला आणि म्हणाले, “काँग्रेससोबत ज्या दिवशी जायाची वेळ येईल. तेव्हा मी माझे दुकान बंद करेन. पण, मी काँग्रेससोबत जाणार नाही. असम्हणाऱ्या बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना होती. आता ती शिवसेना संपली आता नवीनच आले हैबरीट, हैबरीट विचारांची शिवसेना झाली. शिवसेनेच्या विचारांचे अपहरण झाले. यांनी आपल्या विचारांचे धर्मांतरण केले. स्व. बाळासाहेबांचा तो जहाल हिंदूत्ववाद. बाळासाहेबांनी स्वातंत्रवीर सावरकरांनी अपमान जणक वक्तव्या केल्यांनी त्यावेळी बाळासाहेबांनी हाता जोडा घेऊन मणिशंकर अय्यर यांच्या प्रतिकृतीला मारले होते. आणि आता तुम्ही त्यांच्यासोबत बसता स्वातंत्रवीर सावरकरांसंदर्भात निम्मन शब्दात काँग्रेसवाले बोलतात. आणि तुम्ही मांडीला मांडी घालून बसतात. काँग्रेसचा कार्यकर्ता छत्रपती शिवाजी महाराजांची विटंबना तुम्ही त्यांची मांडीला मांडी घालून बसते, अशी शिवसेना ती जुनी गेली. आणि ती नवीन आली,” असे मुनगंटीवार म्हणाले.

सरकारने स्वार्थासाठी पाठिंत खंजीर खुपसले

राज्य सरकार पूर्णपणे कमी पडली. मी आता सर्वोच्च न्यायालयात एक एफिडेविट मागविले आहे.  ठाकरे सरकारने एफिडेविटमध्ये एवढे जरी लिहून दिले असते की, आम्ही सहा महिन्यात सहा महिन्यात इम्पेरिकल डेटा जमा करतो. तर सर्वोच्च न्यायालयाने आमच्या बाजुने दिला असात. वकिलांचे पैसे दिले नाही. तारखेला हजर राहिले नाही. केंद्र सरकार इम्पेरिकल डेटा देऊ शकत नाही, असे शहांनी फडवीसांना सांगितले. तरी देखील विक्रम वेताळसारखा हट्ट सुरूच आहे. हे काय ओबीसी बांधवांचे प्रेम आहे. ठाकरे सरकारने स्वार्थासाठी ओबीसीच्या पाठिंत खंजीर खुपसले, असे मुनगंटीवार यांनी एचडब्ल्यू मराठी बोलताना सरकारवार हल्लाबोल केला आहे. 

सीमा प्रश्न पंडितने पेरले

महाराजांच्या पुतळ्यांची विटंबना झाल्यावर भाजपने आक्रमक भूमिका घेतली नाही, असे एचडब्ल्यू मराठीशी बोलताना म्हणाले, “चंद्रपूरात मोठे आंदोलन झाले. या प्रकरणात काँग्रेसचा कार्यकर्ता  पकडला गेला. त्यांच्याविरोधात शिवसेना आंदोलन केले आहे. उलट भाजपने तर कठोर भूमिका केली आहे. हे सहन करणार नाही, ज्या पंडित नेहरूनी एका अंतरराष्ट्रीय चॅनलच्या मुलाखतीत महाराजांबद्दल अपमाजनक वक्तव्य केली, त्यांच्यासोबत शिवसेना आहेत. तसेच कर्नाटकचा सीमा प्रश्न पंडित नेहरूनी केला. तुम्ही त्यांच्यासोबत मांडीला मांडी घालून बसता. आणि तुम्ही मोठ्या तोरांनी सांगतात की, सीमाप्रश्न सुटत नाही. सीमा प्रश्न पंडित नेहरूनी पेरले आहे. आणि तुम्ही त्यांच्या काँग्रेससोबत आहे. हे आश्चर्य आहे, असे एचडब्ल्यू मराठीशी बोलताना म्हणाले.   

   

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

३१ डिसेंबर साजरा करताय? मग राज्य शासनाचे हे ‘१०’ नियम आधी पाहा! 

News Desk

गृहमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, किरीट सोमैय्यांची मागणी

News Desk

अंबाबाई… कर्जमाफीसाठी मुख्यमंत्र्यांना सुबुद्धी दे – अजित पवार

News Desk