HW News Marathi
महाराष्ट्र

भाजप नेते सुनील यादव आणि राम कदम यांच्या समर्थकांचा मनसेत प्रवेश

मुंबई | मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी भाजप आमदार राम कदम यांना जोरदार झटका दिला आहे. भाजप नेते सुनील यादव आणि राम कदम यांच्या समर्थकांनी मनसेत प्रवेश केला आहे. मुंबईतील चांदिवली विधानसभेतील शेकडो भाजप कार्यकर्त्यांनी मनसेचा झेंडा हाती घेतला आहे.

ठाणे आणि वसई विरार मधील शेकडो भाजप-शिवसेना कार्यकर्त्यांनी मनसेमध्ये प्रवेश केला. मनसे नेते अविनाश जाधव यांच्या नेतृत्वाखाली हा पक्षप्रवेश झाला. यामध्ये सुनील यादव, राम कदम यांच्या समर्थक आणि कार्यकर्त्यांचा भरणा आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या कृष्णकुंज निवासस्थानी हा पक्षप्रवेश झाला आहे.

जुन्या नांदेडमधल्या शिवसेना आणि काँग्रेसमध्ये असलेल्या युवकांनी दोन दिवसांपूर्वी मनसेत प्रवेश केला. त्यामुळे मनसेची ताकद आणखी वाढणार आहे. मनसेचे नांदेड शहर अध्यक्ष बालाजी एकलारे आणि जिल्हाध्यक्ष मॉन्टीसिंघ जहागीरदार यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश सोहळा झाला. आगामी काळात होणाऱ्या महापालिका निवडणुकीसाठी मनसे नांदेडमध्ये पक्ष बांधणी करत असल्याचे चित्र आहे.

शहापूर तालुक्यातही ऑक्टोबर महिन्यात शिवसेनेला मोठे खिंडार पडल्याचे पाहायला मिळाले. मनसेचे ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्या उपस्थितीत शेकडो शिवसैनिकांचा मनसेत प्रवेश झाला.तत्पूर्वी कल्याण-डोंबिवली भागातील शिवसेना आणि भाजपमधील शेकडो कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा झेंडा हाती घेतला. माजी आमदार प्रकाश भोईर आणि महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे ठाणे जिल्हा संपर्क प्रमुख वैभव किणी यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला. त्यामुळे शिवसेना भाजपला ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भगदाड पडल्याची चर्चा रंगली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शालेय मुलांची वाहतूक करणाऱ्या वाहनांची फेरतपासणी करावी 

News Desk

मुंबई महानगरपालिकेचे आज बजेट सादर होणार

News Desk

‘पेट्रोल दरवाढीच्या बदल्यात सुविधा मिळाल्यात’, सुजय विखे पाटलांची खोचक टीका

News Desk