HW News Marathi
महाराष्ट्र

करुणा शर्माच्या गाडीत ठेवलेल्या पिस्तुलाबद्ल भाजप नेते काय म्हणाले?

बीड | बीडमध्ये काल(५ सप्टेंबर) करुणा शर्मा यांच्या गाडीत पिस्तूल ठेवल्याचा विडिओ व्हायरल होत आहे. पिवळी ओढणी ओढलेली एक तरुणी शर्मा यांच्या गाडीच्या डिक्कीत पिस्तूल ठेवत असल्याचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हे प्रकरण गंभीर असल्याचं सांगत त्याची चौकशी करण्याची मागणी केली आहे.

प्रकरणाची सखोल चौकशी व्हायला हवी

विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात त्यांचं मत सांगितलं आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी व्हायला हवी. प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे. त्यापासून वंचित ठेवण्याचं काही कारण नाही. त्याठिकाणी जे काही घडलं त्यावरून कायदा आणि सुव्यवस्था कशाप्रकारे राखली जातेय, हे स्पष्ट होतंय. बंदूक ठेवल्याचा व्हिडीओ, त्यानंतर मिळालेली पिस्टल हा प्रकार गंभीर आहे. याची सखोल चौकशी व्हायला हवी. कुठल्याही दबावाविना याची चौकशी व्हावी, असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.

महाराष्ट्रात लोकशाही मेली की काय?

भाजप नेते निलेश राणे यांनी देखील ट्विट करत त्यांचं मत सांगितलं आहे. “महाराष्ट्रात लोकशाही मेली की काय? पोलिस डिपार्टमेंटचा किती गैरवापर करणार ठाकरे सरकार? महिलेला टोपी लावून, खोटी माहिती देऊन निवडणूक लढवली त्याला वाचवण्यासाठी किती नीचपणा सरकारकडून केला जाणार आहे? पोलिसांचा धाक दाखवून माणुसकीचा गळा दाबला जातोय, १ दिवस सगळ्या विषयांची परतफेड होणार”, अशा शब्दात त्यांनी खंत व्यक्त केली आहे.

काय चाललंय महाराष्ट्रात?

त्यानंतर निलेश राणे यांनी ट्विट करत संताप व्यक्त केला आहे. “करुणा मुंडेची गाडी उघडून त्यात एक व्यक्ती काहीतरी ठेवतांना स्पष्ट दिसत आहे. काय चाललंय महाराष्ट्रात? न्याय मागायला आलेल्या महिलेला ही वागणूक मिळते, चुकीच्या केसमध्ये अटक करण्यात येते. मंत्री मुंडे ने कितीही स्वतःला वाचवायचा प्रयत्न केला तरी एक दिवस त्याला नियती सोडणार नाही”, असा संताप त्यांनी व्यक्त केला आहे.

काय आहे प्रकरण ?

व्हिडीओत शर्मा यांची गाडी बाजारात आल्याचं दिसत आहे. गाडीभोवती गर्दी झाल्याने ही गाडी काही थोडावेळ बाजारात थांबली. त्याच संधीचा फायदा घेत एका व्यक्तीने शर्मा यांच्या कारची डिक्की उघडली. तर पिवळी ओढणी परिधान केलेली महिला कारमध्ये काही तरी ठेवताना दिसत आहे. त्यानंतर ही गाडी पुढे निघून गेल्याचं या व्हिडीओत दिसत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचं ठाणेकरांना कोरोना निर्बंधांचं पालन करण्याचं आवाहन!

News Desk

दिवाळीचा आनंदाचा शिधाचे वितरण आजपासून ऑफलाईन पध्दतीने होणार! – रविंद्र चव्हाण

Aprna

भाजप आणि संघाकडे इतिहासही नाही आणि भविष्यही!

News Desk