HW News Marathi
Uncategorized

“वाघ आहे मी लक्षात ठेवा….कोल्ह्या कुत्र्यांना घाबरणारी नाही”, चित्रा वाघ यांचं महेबूब शेख यांना प्रत्युत्तर

मुंबई | राष्ट्रवादी युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब खान यांनी भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांच्यावर बोचरी टीका केली होती. ‘लाचखोर नवऱ्याची बायको’, असा चित्रा वाघ यांचा उल्लेख आपल्या भाषणात शेख यांनी केला होता. याच टीकेला आता चित्रा वाघ यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. “मी वाघ आहे वाघ…, माझ्यावर कोल्हे कुत्रे भुंकत आहेत. पण मी कोल्ह्या कुत्र्यांना घाबरणारी नाही”, अशा शब्दात त्यांनी महेबूब शेख यांच्यावर पलटवार केला आहे.

मी वाघ आहे… कोल्ह्या कुत्र्यांना मी घाबरणारी नाही

चित्रा वाघ या नेहमी ट्विटरच्या माध्यमातून साडेत्तोड उत्तर देत असतात. ““वाघावर…..कोल्हे कुत्रे भुंकताहेत कारण मी पिडीतांच्या पाठीशी उभी राहते म्हणून……. पण शेवटी मी वाघ आहे… लक्षात ठेवा….कोल्ह्या कुत्र्यांना मी घाबरणारी नाही. सत्तेच्या जोरावर गुन्हे दाखल करुन झाले…. आता माझ्या परिवाराची बदनामी सुरु आहे. पण मी अ्सल्या प्रकाराला घाबरत नाही. मी काय आहे….काय नाही हे तुमच्या बापाला जाऊन विचारा आणि मग या”, असं उघड आव्हान त्यांनी शेख यांना दिलं आहे.

काय म्हणाले महेबूब शेख?

आडनाव वाघ असल्याने कोणी वाघ होत नाही, आणि बाप बदलणारे तर आम्ही मुळीच नाही, डायलॉगबाजी सोडा आणि आपल्या नवऱ्यावर 5 जुन 2016 ला कारवाई झाली तेव्हा सरकार कुणाचं होतं ते सांगा ? त्यांनी कोणत्या बुध्दीने कारवाई केली होती याचं उत्तर द्या. आणि तुम्ही काय आहात हे आम्ही पाहिलंय… कुणाला विचारायची आवश्यकता नाही…., अशा शब्दात मेहबूब शेख यांनी चित्रा वाघ यांना उत्तर दिलं आहे.

जस आम्ही म्हणतो की आमची नार्को टेस्ट करा, तसं तुम्हीही म्हणा की नवऱ्याची पण नार्को टेस्ट करा… कर नाही त्याला डर कश्याला ओ…. आणि भुंकतंय कोण हे महाराष्ट्र बघतोय. आणि मी पण बाप बदलणाराच्या बापाला पण भीत नाही, असं प्रतिआव्हान मेहबूब यांनी चित्रा वाघांना दिलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

एकनाथ खडसेंच्या कन्या रोहिणी खडसेंना ‘कोरोना’ची लागण

Gauri Tilekar

धनंजय मुंडेंच्या हस्ते ‘ई-ऊसतोड कल्याण’ अँपचे बीड येथे लोकार्पण

News Desk

Sharad Pawar On Harshwardhan Patil | हर्षवर्धनसाठी भरणे थांबणार होते,पण..त्याला भाजपात जायचं होतं..

Arati More