HW News Marathi
महाराष्ट्र

नाशिकमध्ये भाजपला धक्का, २ नेते हाती बांधणार शिवबंधन

नाशिक | आगामी महानगरपालिका निवडणूक तोंडावर आली असताना संपूर्ण राजकीय क्षेत्रात राजकारणात चलबिचल सुरु झाली आहे. नाशिकमध्येही राजकीय वारे वाहायला सुरुवात झाली आहे. माजी आमदार बाळासाहेब सानप यांनी शिवसेनेला रामराम करत भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर आता भाजपचे दोन बडे नेते, वसंत गीते आणि सुनील बागुल आज (८ जानेवारी) शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. या दोन्ही नेत्यांनी कालच (७ जानेवारी) शिवसेना खासदार संजय राऊत यांची भेट घेतली होती. राऊतांशी चर्चा केल्यानंतर त्यांच्या शिवसेना प्रवेशावर शिक्कामोर्तब झालं होतं. आज संध्याकाळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांचा शिवसेनाप्रवेश होणार आहे. उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी म्हणजेच मातोश्रीवर हा प्रवेशसोहळा पार पडणार आहे.

नाशिक महापालिका निवडणूक जवळ आली आहे. पालिकेवर आपल्याच पक्षाचा झेंडा फडकवण्यासाठी सर्व पक्ष जमेल त्या पद्धतीने राजकीय दावपेच टाकत आहेत. शिवसेनेनेही रणनीती आखायला सुरुवात केली आहे. माजी आमदार बाळासाहेब सानप यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी दिल्यानंतर ही पोकळी भरुन काढण्यासाठी शिवसेनेकडून प्रयत्न सुरु होते. त्यानंतर आता नाशिक भाजपचे दोन बडे नेते वसंत गीते आणि सुनील बागुल हे शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. त्यांच्यासोबत आणखी काही नगरसेवकसुद्धा शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. महापालिकेच्या पार्श्वभूमीवर भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

…तोपर्यंत मी फेटा बांधणार नाही !

News Desk

भाजपमुक्त लातूर पॅटर्न मराठवाड्याच्या कानाकोपऱ्यात पोहचवा! – नाना पटोले

Aprna

मलिकांच्या राजीनाम्याबद्दल छगन भुजबळाचे मोठे विधान

Aprna