HW News Marathi
Covid-19

“…मग राज्यकर्ते म्हणून तुम्ही काय करणार?”, चंद्रकांत पाटलांचा सवाल

मुंबई । “सर्व काही केंद्र सरकारवर ढकलणार असाल तर मग राज्यकर्ते म्हणून तुम्ही काय करणार?”, असा थेट सवाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना केला आहे. राज्यातील कोरोनास्थितीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी साधलेल्या संवादानंतर आता चंद्रकांत पाटील यांनी एक प्रेस नोट काढत हा सवाल उपस्थित केला आहे.

हा तहान लागल्यावर विहीर खणण्याचा प्रकार !

चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले की, राज्यात कोरोनाची दुसरी लाट येणार ही अपेक्षा होते असे मुख्यमंत्र्यांनी स्वतःच कबूल केले. मग त्या लाटेचा सामना करता यावा यासाठी मधल्या 5 महिन्यांच्या काळात राज्य सरकारने काय तयारी केली ? तहान लागल्यावर विहीर खणण्याचा हा प्रकार आहे. मुख्यमंत्र्यांनी नोव्हेंबर महिन्यातच कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची भीती व्यक्त केली होती. मधल्या ५ महिन्यांतच असे ऑक्सिजन प्रकल्प उभे केले असते तर आज त्यासाठी धावाधाव करावी लागली नसती.

चंद्रकांत पाटील पुढे म्हणतात की, “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ऑक्सिजन, रेमडेसिवीर, कोरोना लस अशा प्रत्येक गोष्टींसंदर्भात केंद्रावर जबाबदारी ढकलण्याचा प्रयत्न केला आहे. कोरोनाशी लढण्यासाठी जर सर्वच केंद्र सरकारने करायचे असेल तर राज्य सरकार स्वतःहून काय करणार?”

मुख्यमंत्र्यांना लसींची थेट खरेदी करता आली असती !

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी लसींच्या एकरकमी खरेदीबाबत जे विधान केले त्याबाबत बोलताना चंद्रकांत पाटील म्हटले की, “आम्ही 12 कोटी लसी एक रकमी विकत घेण्यास तयार असल्याचे मुख्यमंत्री म्हणतात. मात्र, केंद्राने राज्य सरकारांना लसींची थेट खरेदी करण्याची परवानगी दिली आहे. असे असताना मुख्यमंत्र्यांनी केंद्राच्या मागे लपण्याची गरज नाही.”

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबईतील ‘या’ रेस्टोरंटमध्ये १० कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह

News Desk

राज्यात काल ८,३६९ नवे रुग्ण आढळले, तर २४६ जणांचा झाला मृत्यू

News Desk

आपल्याच लोकांना राज्यात घ्यायला त्यांचा विरोध आहे, मजुरांचे दु:ख विचारणार्‍यांचा द्वेष | सामना

News Desk