HW Marathi
महाराष्ट्र राजकारण

पंकजा मुंडेंच्या पक्षांतराच्या बातम्या केवळ अफवा, भाजपमध्ये होत्या, आहेत आणि राहतील !

मुंबई | भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे विधानसभा निवडणुकीच्या पराभवानंतर पक्षांतर करणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज (२ डिसेंबर) पत्रकार परिषद बोलविली होती. यात पाटील म्हणाले की, “पंकजांच्या पक्षांतराच्या बातम्या या केवळ अफवा असून त्या भाजपमध्ये होत्या, आहेत आणि राहतील,’ असे स्टष्टीकरण त्यांनी दिले आहे. तसेच “पंकजाच काय अनेक नेते शिवसेनेच्या संपर्कात,” असल्याचा दावा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. राऊतांनी पत्रकार परिषदेत पंकज मुंडे यांच्यासंदर्भात प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी हे उत्तर दिले होते. पंकजा मुंडे काय करतात, ते १२ डिसेंबरला कळलेच, असे सूचक विधान राऊतांनी केले होते.

यात पाटील म्हणाले की, “भाजपच्या आजच्या स्थितीमध्ये गोपीनाथ मुंडेंचे मोठे योगदान आहे. पंकजा मुंडे या गोपीनाथ मुडेंनी उभारलेल्या भाजपच्या कार्यकर्त्या, नेत्या आहेत. त्यामुळे, भाजप सोडून इतर कुठल्याही पक्षासोबत त्या जाणार नसल्याचे त्यांनी म्हटले. विशेष म्हणजे आमचे त्यांच्याशी बोलणे झालेले आहे, त्यामुळे मीडियातील या बातम्या केवळ अफवा असल्याचे सप्ष्टीकरण पाटील यांनी दिले.

पंकजा मुंडे यांच्या ट्विटर हॅण्डलवर सध्या भाजपचा उल्लेख नाही, मुंडेंच्या ट्विटर हँडलवरील बायोमधून त्यांनी भाजपमधील पदाचा उल्लेख हविण्यात आले आहे. पंकजा मुंडे यांनी काल (१ डिसेंबर) फेसबुक पोस्ट लिहून, १२ डिसेंबरला भाजपचे जेष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांची जन्मदिवस असून या दिवशी सर्व कार्यकर्त्यांना  गोपीनाथगडावर भेटू, असे आव्हान केले आहे. मुंडे-महाजन आणि ठाकरे कुटुंबीयांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. मात्र त्यामुळे पंकजा भाजप सोडणार नाहीत, असा विश्वास विनोद तावडे यांनी व्यक्त केला.

 

 

Related posts

गिरीश बापट यांनी आपल्या कर्तव्यात कसूर केली | उच्च न्यायालय

News Desk

सरसंघचालकांनी वडीलकीच्या नात्याने राज्यकर्त्यांचे कान उपटायला हवेत | ठाकरे

News Desk

काँग्रेसकडून ‘भाजपचा शिशुपाल मोदींच्या १०० चुका’ या पुस्तिकेचे प्रकाशन

News Desk