मुंबई | देशात कोरोना रुग्णांच्या संख्येने १ लाखाच्या पुढे गेली आहे. तर राज्या कोरोनाबाधितांच्या आकडेवारी ३५ हजार ५८ वर पोहोचली आहे. देशासह राज्यात कोरोना संकटचा सामना करत आहे. तर दुसऱ्या बाजुला राज्यात विरोधक आणि सत्ताधारी आमने-सामने आले आहे. “गैरसोय होत आहे लॉकडाऊन ४ सुरू झाले पण राज्य सरकारकडे अजूनही काही ठोस पाऊलं उचलताना दिसत नाही,” अशी ट्वीट महाराष्ट्र भाजपने काल (१८ मे) केले आहे. या टीकेला महाराष्ट्र काँग्रेस ट्वीट कत उत्तर दिले की, “फेक न्यूज पसरवून लोकांमध्ये संभ्रम निर्माण करणे ही भाजप महाराष्ट्राची कार्यपद्धती आहे.
https://twitter.com/BJP4Maharashtra/status/1262403042101604353?s=20
“महाराष्ट्रातील परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत आहे.कॉरंटाईनची सोयीसुवीधा असतील,रूग्णालय असतील,पेशंटची गैरसोय होत आहे लॉकडाऊन ४ सुरू झाले पण राज्य सरकारकडे अजूनही काही ठोस पाऊलं उचलताना दिसत नाही,” अशी ट्वीट महाराष्ट्र भाजपने काल (१८ मे) केले आहे. या ट्वीटमध्ये एक व्हडीओ शेअर केला आहे. त्या काही लोकांना क्वारंटाईल केल्याचे ते म्हणत आहे. यावर महाराष्ट्र काँग्रेसने ट्वीट करत म्हणाले, “फेक न्यूज पसरवून लोकांमध्ये संभ्रम निर्माण करणे ही भाजप महाराष्ट्र ची कार्यपद्धतीच आहे. कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी दमडीचीही मदत न करणाऱ्या भाजपच्या नेत्यांना जुने व्हिडीयो टाकून राजकारण करताना लाज कशी वाटत नाही?”, अशी टीका केली. तर शेवटी #ShameOnYouBJP म्हणाले आहे.
फेक न्यूज पसरवून लोकांमध्ये संभ्रम निर्माण करणे ही @BJP4Maharashtra ची कार्यपद्धतीच आहे. कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी दमडीचीही मदत न करणाऱ्या भाजपच्या नेत्यांना जुने व्हिडीयो टाकून राजकारण करताना लाज कशी वाटत नाही? #ShameOnYouBJP https://t.co/EjAkYCk8XF
— Maharashtra Congress (@INCMaharashtra) May 19, 2020
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.