HW News Marathi
महाराष्ट्र

भाजप कार्यकारणीची उद्या मुंबईत बैठक होणार

मुंबई | उद्या (८ ऑक्टोबर) भाजपची कार्यकारिणी बैठक होणार आहे. दादरच्या वसंत स्मृती कार्यालयात एक दिवसीय प्रदेश कार्यकारणीची बैठक, आगामी पदवीधर, पालिका निवडणुका तयारी आढावा, संघटना बांधणी, कोरोना परिस्थिती, राज्य सरकार विरोधात मोर्चे बांधणी / रणनीती यावर होणार चर्चा होणार आहे. कोरोना परिस्थितीमुळे प्रदेश कार्यकरिणीला मर्यादित लोकांचीच उपस्थिती असणार आहे. तसेच, उपस्थितांना कोरोना चाचणी बंधनकारक करण्यात आलेली आहे.

भाजपने ३ जुलैला राज्यातल्या कार्यकारिणीची घोषणा केली होती. गेल्या काही दिवसांपासून साईडलाईनला गेलेल्या नेत्यांमध्ये चंद्रशेखर बावनकुळे यांना सरचिटणीस पद देण्यात आले आहे. तर विनोद तावडे, एकनाथ खडसे, प्रकाश मेहता या नेत्यांना प्रदेश कार्यकारिणी सदस्य विशेष निमंत्रित पद मिळाले होते. त्यामूळे या बैठकीत काय होणार याकडे लक्ष लागले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Unlock 1.0 | पेट्रोल कंपन्यांची दरवाढ सुरूच

News Desk

“लोकलने लोकं प्रवास करतात, वरळीत पब सुरु असतो मग परीक्षा पण झाल्याच असत्या”, भाजपचा टोला

News Desk

एनसीबीने बॉलिवुड आणि ड्रग्सचा तपास केला नाही तर मुंबई पोलीस तपास करणार- गृहमंत्री

News Desk