HW News Marathi
महाराष्ट्र

भाजप विधीमंडळ पक्ष नेत्याच्या निवडीसाठी बैठक

मुंबई | भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विधीमंडळ पक्षनेता ठरविण्यासाठी आज बैठक बोलविण्यात आली आहे. दोन्ही पक्षांनी आज (३० ऑक्टोबर) महत्त्वपूर्ण बैठक सुरू आहे. या एका बाजुला त्यांच्या भाजपच्या पक्षनेता निवडीसाठी बैठकीला सुरुवात झाली आहेत. या बैठकीत त्यांचा मुख्यमंत्री पदाचा उमेदवार देणार आहे. या बैठकीला भाजपचे १०५ नवनिर्वाचित आमदार फेटे घालून विधिमंडळाच्या पायऱ्यांवर उभे आहेत.

मुख्यमंत्री विधीमंडळात आल्यानंतर सर्व आमदारांनी त्यांना देखील फेटा बांधला.  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधीमंडळात आल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला आहे. मुख्यमंत्री विधीमंडळात इमारतीच्या १० व्या मजल्यावरील सभागृहात नेत्या निवडीच्या कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे. भाजपची ही बैठक औपचारिक असल्याची माहिती मिळाली आहे.

या बैठकीला भाजपचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, महाराष्ट्र प्रभारी भुपेंद्र यादव, नरेंद्रसिंह तोमर, माध्यमिक शिक्षण मंत्री आशिष शेलार आणि राष्ट्रीय उपाध्यक्ष अविनाश खन्ना उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत नव्याने निवडून आलेले आमदार त्यांचा विधीमंडळ पक्षनेता निवडणार आहेत.

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मातोश्रीमध्ये भुताटकी तिथे शांतीतज्ञ करा, नारायण राणेंचा खोचक सल्ला

News Desk

अर्णब गोस्वामींची रवानगी अलिबागमधील नगरपालिका शाळेत, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्णय

News Desk

एससी-एसटी आरक्षण मुदत वाढीसाठी आज एकदिवसीय विशेष अधिवेशन

News Desk