HW News Marathi
Covid-19

भाजपच्या आमदार-खासदारांमध्येच अंतर्गत मतभेद, पडळकरांची संजय पाटलांवर टीका

सांगली | राज्यात प्रत्येक जिल्ह्यातील कोरोनाचे प्रमाण वाढत आहे तर कुठे कमी होत आहे. यावरून अनेक ठिकाणी राजकारण देखील सुरु असल्याचे समोर आले आहे. सांगलीोतील कोरोना परिस्थिती हाताळण्यावरून आता भाजपाच्याच आमदार-खासदारांमध्ये मतभिन्नता दिसेन आली आहे. भाजपच्या विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी सांगलीचे भाजप खासदार संजय काका पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे.

सांगली जिल्ह्यात आता सामुदायिक कोरोनाचे संक्रमण जास्त वाढत चालले आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यात जिल्हा प्रशासनातील प्रमुख अधिकारी अपयशी ठरल्याने तातडीने त्यांची बदली करण्याची मागणी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून खासदार संजय पाटील यांनी केली आहे. तसेच सांगली जिल्ह्यात कोरोना परिस्थितीचा अभ्यास, निरीक्षण आणि देखरेखीसाठी केंद्र सरकारच्या मार्फत पथक पाठवून येथील परिस्थितीचा आढावा घ्यावा, त्यासंदर्भात उपाययोजनांबाबत स्थानिक प्रशासनाला आदेश द्यावा अशी मागणीही केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री अश्विनीकुमार चौबे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे पत्राद्वारे केली होती.

मात्र, भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी खासदार पाटील यांच्या या भूमिकेवर आक्षेप घेतला आहे.”आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलिस अधिक्षक यांच्यासह सर्वच अधिकारी खूप चांगले काम करत आहेत. जिल्ह्याला चांगले अधिकारी मिळाले आहेत, माझा त्यांना पाठिंबा आहे. अधिकाऱ्यांवर टीका करण्याची ही वेळ नाही, ही वेळ बदली करण्याची नाही, असे करुन अधिकारी वर्गाचे खच्चीकरण करु नका. नवे अधिकारी आले तर परिस्थिती समजून घेण्यात त्यांचा वेळ जाईल. मी अधिकाऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे,” असे म्हणत पडळकर यांनी खासदार संजय पाटील चुकीची मागणी करत असल्याचे आरोप केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अज्ञानापेक्षा अहंकार हा सर्वाधिक धोकादायक, लॉकडाऊनने हे सिद्ध केले !

News Desk

काँग्रेस एकाच जागेवर विधानपरिषद निवडणूक लढणार, ‘या’ उमेदवाराचे नाव मागे

News Desk

मुंबई लोकल सर्वांसाठी सुरु करण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील, रेल्वे मंत्रालयाच्या निर्णयाकडे लक्ष 

News Desk