HW News Marathi
देश / विदेश

रोहित पवार जरा तुम्ही शरद पवारांच्या खांद्यावरून खाली उतरा !, पडळकरांची टीका

मुंबई | भाजपचे विधान परिषद आमदार गोपीचंद पडळकर यांनी कर्जत-जामखेडचे राष्ट्रवादीचे आमदार आणि अध्यक्ष शरद पवारांचे नातू रोहित पवारांना टोला लगावला आहे. “गेल्या ५० वर्षांपासून नेतृत्व करत असलेल्या शरद पवारांच्या खांद्यावर बसून मी महाराष्ट्रात सर्वात उंच आहे असा आभास झालेल्या रोहित पवारांनी खाली मतदारसंघात उतरून आपल्या कामावर लक्ष द्यावं. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सल्ले देत बसू नये”, असा बोचरा सल्ला गोपीचंद पडळकर यांनी रोहित पवारांना दिला आहे.

कर्जत-जामखेड मतदारसंघातील मिरजगाव येथील रस्त्यांच्या दुरावस्थेच्या पार्श्वभूमीवर एक व्हिडीओ शेअर गोपीचंद पडळकर यांनी रोहित पवारांवर निशाणा साधला आहे. या व्हिडिओमध्ये गोपीचंद पडळकर म्हणतात कि, “रोहित पवार जरा तुम्ही शरद पवारांच्या खांद्यावरून खाली उतरा म्हणजे तुम्ही किती खुजे आहात हे तुम्हाला कळेल.” पुढे पडळकर असेही म्हणतात कि, “तुम्हाला साध्या गावातल्या रस्त्याचे काम करता येत नसेल आणि तुम्ही देशाच्या नेतृत्वांना सल्ले देत असाल तर हे सल्ले देण्यापेक्षा कर्जत मतदारसंघातील या रस्त्यांची अवस्था आणि लोकांचे प्रश्न जाणून घ्या. ते अधिक गरजेचे आहे.

गोपीचंद पडळकर यांनी अत्यंत बोचऱ्या शब्दात टीका करताना असे म्हटले आहे कि, “गेल्या ५० वर्षापासून नेतृत्व करत असलेल्या शरद पवारांचे नातू रोहित पवार यांचा हा मतदारसंघ आहे. मी आज औरंगाबादला दौऱ्यानिमित्त जात असताना त्यांच्या मतदारसंघात प्रवेश केल्यापासून रस्त्यांची प्रचंड दुरावस्था पाहायला मिळत आहे. या रस्त्यांवर प्रचंड खड्डे आहेत. खरंतर, रोहित पवार हे रोज सतत टीव्ही आणि ट्विटरवर पंतप्रधान मोदी आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना सल्ले देत असतात. त्यांना आपली उंची फार वाढलीये असे वाटते. मात्र, त्यांना अजून कल्पना नाही कि शरद पवारांच्या खांद्यावर बसून ते स्वतःची उंची मोजतात.”

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“राज्याला उद्योग-प्रकल्प आणि गुंतवणुकीत सहकार्य करावे”, मुख्यमंत्र्यांचा पंतप्रधानांना फोन

Aprna

सैन्यात दलित आरक्षणासाठी पंतप्रधानांशी चर्चा – रामदास आठवले

News Desk

एकाच कुटुंबातील चार जणांची निर्घृण हत्या

News Desk