HW News Marathi
महाराष्ट्र

दोन हजार कोटीची बँक व त्याची मालमत्ता गिळंकृत करण्याचा डाव, पडळकरांचा पवारांवर आरोप

मुंबई | भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. गेल्या सहा महिन्यापासून एसटी कर्मचारी आपल्या हक्कासाठी लढा देत होता. आता शकुनी काकांनी याचाच फायदा उचलून दोन हजार कोटीची बँक व त्याची मालमत्ता गिळंकृत करण्याचा डाव आखलाय, असा टोला शरद पवारांनी पडळकरांनी लगावाल आहे. पडळकर पुढे म्हणाले, “मागील सहा महिन्यापासून एसटी कर्मचारी आपल्या हक्कासाठी लढा देत होता. आता शकुनी काकांनी याचाच फायदा उचलून दोन हजार कोटीची बँक व त्याची मालमत्ता गिळंकृत करण्याचा डाव आखलाय. बँकेची निवडणूक घोषीत केलीये आणि जे सदस्य थकबाकीदार आहेत त्यांना मतदानाचा अधिकार राहणार नाही असा फतवा काढलाय साहाजिकच जे कर्मचारी बिनपगारी आपल्या हक्कासाठी लढा देत होते तेच थकबाकीदार आहेत. त्यामुळे त्यांना मतदानाचा हक्क मिळणार नाही.”

पडळकर म्हणाले, “१९९५ ला इंटकला हाताशी पकडून शरद पवारांनी स्वत:च्याच एकमेव संघटनेला मान्यताप्राप्त करून दिली. आणि सभासद फीस नावाखाली हजारो कर्मचाऱ्यांकडून कोट्यावधी रूपये वसूल केले. त्या व्यतिरिक्त अधिवेशनाखाली ५०० रूपये व वाढदिवसानिमित्त मनसोक्त रक्कम, अशा वेगवेगळ्या मार्गानं जवळपास १०० कोटी रूपये गिळंकृत केले. त्यातूनच वर्षाआड आपल्याच बगलबच्च्यांना २०-२० लाखांच्या आलीशान गाड्या खरेदी करून दिल्या आहे.”

दरम्यान, “ज्यावेळेस एसटी कामगार व त्यांचा परिवार उपाशी पोटी उघड्यावरती लढा देत होतो. त्यावेळेस या संघटेनेचे सर्वेसर्वा यांनी माणुसकीखातीर आपल्या सिल्वर ओकवरून एक वेळचं जेवण तर सोडा पण साधं चहापाणी सुद्धा पाठवलं नाही. जरा तरी यांच्यात माणुसकी शिल्लक असती तर यांनी त्या १३५ विधवा भगिनींना आर्थिक मदत दिली असती. अशा मुघलाई प्रवृत्तींना आम्ही धडा शिकवणार आहोत व कायदेशीररित्या यांचा डाव उधळून लावणार आहोत,” असे पडळकर म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ठाकरे सरकारने मराठा आरक्षणचा नियोजित पद्धतीने खून केला आहे!

News Desk

नैसर्गिक आपत्तीत शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत! – धनंजय मुंडे

Aprna

भाजपची नवी राज्य कार्यकारिणी जाहीर, खडसे-मुंडेंबाबत पक्षाचा हा निर्णय

News Desk