HW News Marathi
महाराष्ट्र

आमचे आमदार वारले, नागपूरात एक पोस्ट का झाली व्हायरल?

नागपूर | संपूर्ण महाराष्ट्रात कोरोनाचा उद्रेक होत असताना मुंबई, पुणे आणि नागपुरातही कोरोनाचा कहर होत आहे. अशात आमदार लक्ष देत नाहीत आणि मतदारसंघात फिरकलेच नसल्याची तक्रार केली जात आहे. अशा परिस्थितीत नागपुरातील कामठी मतदारसंघातील भाजपचे आमदार टेकचंद सावरकर हरवल्याची एक पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली आहे. इतकंच नाही तर संतापलेल्या काहींनी आमदार सावकर हे कोरोनामुळे वारले असंही लिहून पोस्ट व्हायरल केली. या प्रकारामुळे संतापलेल्या आमदार टेकचंद सावरकर यांनी पोलिसात तक्रार दिली आहे.

काय आहे नेमकं प्रकरण?

नागपुरात कोरोनाचं थैमान आहे. मात्र कामठी मतदारसंघातील भाजप आमदार टेकचंद सावरकर हे मतदारसंघात फिरकलेच नसल्याची स्थानिकांची तक्रार आहे. त्यामुळे आमदार महोदय हरवल्याची पोस्ट, सोशल मीडियावर सध्या फिरत आहे. इतकंच काय तर संकटाच्यावेळी आमदार महोदयांनी जनतेला वाऱ्यावर सोडल्याचा आरोप करत, संतापलेल्या एका मतदाराने, आमदार सावरकर यांचं कोव्हिडमुळे निधन झाल्याची पोस्टही व्हायरल केली.

या संदर्भात आमदार टेकचंद सावरकर यांनी शहरातील वाठोडा पोलीस स्थानकात जाऊन पोस्ट व्हायरल करणाऱ्याविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. आमदार टेकचंद सावरकर हे नागपूर जिल्ह्यातील कामठी मतदारसंघाचं नेतृत्त्व करत असून कोरोनाची परिस्थिती बिकट झाल्यापासून टेकचंद सावरकर मतदारसंघात फिरलेच नसल्याचा आरोप आहे. त्यामुळे अनेकांनी ते हरवल्याची पोस्ट केली तर काहींनी श्रद्धांजलीचा कार्यक्रमही आटपला होता. यामुळे संतापलेल्या आमदारांनी शहरातील वाठोडा पोलीस स्थानकात जाऊन पोस्ट व्हायरल करणाऱ्यांविरुद्ध तक्रार दाखल केली. सोशल मीडियावर आपली बदनामी केली जात असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सुशांतसिंह ड्रग्ज प्रकरणी एनसीबी ३० हजार पानांचं आरोपपत्र दाखल करणार, रिया चक्रवर्तीचंही त्यात नाव

News Desk

मुंबईसह देशभरात बकरी ईद साजरी

swarit

बॉलिवुड ड्रग्स प्रकरण : अभिनेत्री दीपिका पादुकोण एनसीबी कार्यालयात दाखल 

News Desk