HW News Marathi
Covid-19

देशात कोरोनाचे थैमान! २४ तासांत ३ लाख ४९ हजारांहून अधिक रुग्ण आढळले

नवी दिल्ली | देशात गेल्या २४ तासांत ३ लाखांहून जास्त कोरोनाबाधित सापडले आहेत. २४ तासांत ३ लाख ४९ हजार ६९१ नव्या कोरोनाबाधितांची भर पडली आहे. त्याचवेळी देशात बरे झालेल्या रुग्णांची संख्या देखील वाढली असून आजघडीला देशात कोरोनाचे एकूण २६ लाख ८१ हजार ७५१ अॅक्टिव रुग्ण आहेत.

देशात आत्तापर्यंत एकूण १ कोटी ६९ लाख ६० हजार १७२ करोनाबाधित सापडले आहेत. तर त्यापैकी १ कोटी ४० लाख ८५ हजार ११० रुग्ण हे बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे रिकव्हरी रेटच्या बाबतीत काहीसा दिलासा असला, तरी गेल्या दोन महिन्यांमध्ये देशातील कोरोनाची रुग्णसंख्या आणि मृतांचा आकडा मोठ्या प्रमाणावर वाढू लागला आहे.

 

तर दुसरीकडे राज्यातही कोरोना कहर वाढत चालला आहे. राज्यात ६७,१६० कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली असून ६३,८१८ कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण ३४६८६१० रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत.राज्यात एकूण ६९४४८० ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ८२.०२% झाले आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळाने आजच्या बैठकीत घेतले ‘हे’ महत्त्वाचे १२ निर्णय

News Desk

कर्नाटकात आजच्या एका दिवसात तब्बल ४५ कोटींची मद्यविक्री

News Desk

राज्यात आज १४ हजारांहून अधिक नवे कोरोनाबाधित, तर ३३९ जणांचा मृत्यू

News Desk