नागपूर | काटोलचे आमदार आशिष देशमुख यांनी भाजपच्या आमदारकीचा आज (२ ऑक्टोबर) राजीनामा दिला आहे. राजीनामा दिल्यानंतर आज महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्ताने काँग्रेसने वर्ध्यात कार्यकारणी बैठक आयोजन केले आहे. आणि काँग्रेसच्या जाहीर सभेत देशमुख यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थिती काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. काँग्रेसचे माजी मंत्री रणजीत देशमुख यांचे ते चिरंजीव असून त्यांनी वडिलांप्रमाणेच ते काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.
#Maharashtra: BJP MLA from Katol Dr Ashish Deshmukh submits his resignation to the Speaker of the Maharashtra Legislative Assembly.
— ANI (@ANI) October 2, 2018
देशमुख यांनी ई-मेल आणि फॅक्सने मुंबईला राजीनामा पाठविला आहे. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांची ते बुधवारी भेट घेऊन त्यांच्याकडे राजीनामा सोपविणार असल्याची माहिती मिळील आहे. ‘मी २ ऑक्टोबर २०१८ पासून विधानसभेतील माझ्या आमदारकीचा राजीना देत आहे,’ असे आशिष देशमुख यांनी हरिभाऊ बागडे यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.