HW News Marathi
राजकारण

काँग्रेसच्या सचिव पदी अभिनेत्री नगमा यांची वर्णी

मुंबई | माजी खासदार प्रिया दत्त यांना काँग्रेस पक्षाच्या सचिवपादवरून पाय उतर केल्यानंतर आता पक्षाने अभिनेत्री नगमा यांच्या नावाची चर्चा रंगली आहे. २०१९च्या लोकसभा निवडणुकीसाठी मुंबईतील उत्तर मध्य मतदारसंघातून प्रिया दत्त यांच्याऐवजी अभिनेत्री नगमा यांची वर्णी लागणार असल्याची माहिती मिळाली आहे.

अभिनेत्री नगमा यांनी उत्तर प्रदेश, राजस्थान आणि कर्नाटकमध्ये काँग्रेससाठी अनेक रोड शो केले आहेत. काँग्रेसच्या रविवारी झालेल्या बैठकीत नगमा उपस्थित राहिल्याने त्यांना सचिव पदी वर्णी लागण्याच्या बातम्यांना दुजोरा मिळत आहे. परंतु काही नेत्यांच्या मते, सचिव पदासाठी प्रिया दत्त याच खऱ्या दावेदार असल्याचे पक्षातील काही नेत्यांकडून सांगितले जात आहे.

प्रिया दत्त यांचा अल्प परिचय

प्रिया दत्त या अभिनेता सुनील दत्त यांच्या कन्या आहेत. प्रिया दत्त यांनी उत्तर मध्य मतदारसंघातून दोन वेळा विजयी झाल्या आहेत. सुनील दत्त यांच्या निधनानंतर २००५ साली झालेल्या पोटनिवडणूक आणि २००९च्या लोकसभा निवडणुकीत प्रिया विजयी झाल्या होत्या. परुंत २०१४ साली त्यांना पराभवचा सामना करावा लागला होता.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टर अपघाताला पायलट जबाबदार

News Desk

“ना मुख्यमंत्री, ना नेता अशी महाराष्ट्राची परिस्थिती”, उद्धव ठाकरेंची खंत

Aprna

गरज पडली तर आंबेडकर स्मारकासाठी राज्य गहाण ठेवू !

News Desk