HW News Marathi
महाराष्ट्र

‘निवडणुकीला उभं करून पाडायचं षडयंत्र संजय काकांनींच रचलं’, भाजपाच्या माजी आमदाराचा खासदारावर गंभीर आरोप!

सांगली भाजपामधील अंतर्गत वाद आता चव्हाट्यावर आला आहे. जत विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार विलास जगताप यांनी खासदार संजय पाटील यांच्यावर भर कार्यक्रमात जाहीरपणे बोलताना गंभीर आरोप केले आहेत. खासदार संजय पाटील हे फसवणारे नेते, त्यांनीच मला माझी इच्छा नसतानाही निवडणुकीसाठी उभं केलं व मला पाडण्याचं षडयंत्र देखील त्यांनीच रचलं असल्याचं विलास जगताप यांनी जाहीरपणे बोलून दाखवलं आहे. त्यामुळे आता विलास जगताप यांच्या या गंभीर आरोपानंतर व टीकेनंतर खासदार संजय पाटील काय भूमिका घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.

पाडायला सुद्धा त्यांनीच षड्यंत्र केलं

”खासदार संजय काका पाटील हे फसवणारे नेते आहेत. माझी इच्छा नसताना २०१९ ला त्यांनी मला पुन्हा निवडणुकीला उभा राहायला सांगितलं. मात्र मला पाडायला सुद्धा त्यांनीच षड्यंत्र केलं. मी झकमारी केली आणि त्यांचं एकूण निवडणुकीला उभा राहिलो. संजय पाटील सारखे खोटे बोलणारे अनेक लोक आपल्याला आयुष्यात भेटतात अशा फसवणाऱ्या लोकांच्या पासून सावधान रहा.” असे भाजपाचे नेते आणि जतचे माजी आमदार विलासराव जगताप यांनी म्हटलं आहे.

संजय पाटील सारखी घातकी मित्र आयुष्यात कधी कोणाला मिळू नये

तसेच, ”संकटात जो मदत करतो तोच खरा मित्र. संजय पाटील सारखी घातकी मित्र आयुष्यात कधी कोणाला मिळू नयेत. माणसाच्या मागे किती मत आहेत, हे महत्त्वाचे नाही पण त्या माणसाचे विचार कसे आहेत हे महत्त्वाचं असतं. जय-पराजय कोणाचे होत नाही मी सुद्धा दोनदा पराभूत झालो आणि एकदा आमदार झालो. मला पण काम करायची संधी मिळाली. पण अशा घातकी मित्रांपासून सावध राहणे हे फार गरजेचे असते.” असंही विलास जगताप यांनी बोलून दाखवलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सरसकट शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले उत्तर…

News Desk

जलसंपदाचे १०४ प्रकल्प येत्या दोन वर्षात पूर्ण करण्याचा मानस! – जयंत पाटील

Aprna

‘ईडी’चा यू टर्न, शरद पवारांनी तूर्तास चौकशीला येण्याची गरज नाही

News Desk