HW News Marathi
महाराष्ट्र

‘तेजस ठाकरे जीवसृष्टी सोडून राजकारणात येईल असं वाटत नाही’, छगन भुजबळांचं भाष्य!

नाशिक। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे लहान चिरंजीव तेजस ठाकरे आता राजकारणात येणार असल्याचं महापौर किशोरी पेडणेकर यांनी स्पष्ट केले आहे. त्यावरून आता अनेकांच्या प्रतिक्रिया यायला देखील सुरुवात झाली आहे, नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनीही त्यावर आता प्रतिक्रिया दिली आहे. तेजस ठाकरे माझ्या डोक्याबाहेरचा विषय आहे. जीवसृष्टी सोडून तो राजकारणात येईल, असं वाटत नाही, असं छगन भुजबळ यांनी पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली आहे.

जीवसृष्टी सोडून तो राजकारणात येईल असं वाटत नाही

छगन भुजबळ यांनी माध्यमांशी बोलताना ही प्रतिक्रिया दिली. तेजस अतिशय अवघड आहे. माझ्या डोक्याबाहेरचा विषय आहे तो. जीवसृष्टी सोडून तो राजकारणात येईल असं वाटत नाही. अर्थात त्याबाबतचा निर्णय ठाकरे कुटुंबीयच घेतील, असं भुजबळ म्हणाले. तसेच युवकांनी राजकारणात आलं पाहिजे, असं मतही त्यांनी व्यक्त केलं.

ऑपरेशन कमळ होणार नाही

दिल्लीत भाजपची बैठक होत आहे. राज्यातील नेते दिल्लीत गेले आहेत. त्यावरही त्यांनी भाष्य केलं. राज्यात ऑपरेशन कमळ होणार नाही. दिल्लीत काहीही होऊ द्या. कितीही बैठका होऊ द्या. पण ऑपरेशन कमळ होणार नाही, असं ते म्हणाले.

भाजप-मनसे एकत्र येत असेल तर चांगलं आहे

यावेळी त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजप नेते चंद्रकांत पाटील यांच्या भेटीवरही भाष्य केलं. भाजप-मनसे एकत्र येत असेल तर चांगली गोष्ट आहे. लोकशाहीत सर्वांना एकत्र येण्याचे अधिकार आहेत. शेवटी कुणाच्या बाजून कौल द्यायचा हे लोकं ठरवत असतात, असं ते म्हणाले.

‘सामना’तून शुभेच्छा

शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांनी तेजस यांच्या वाढदिवसानिमित्ताने दैनिक ‘सामना’च्या पहिल्या पानावर जाहिरात दिली आहे. त्यात त्यांनी तेजस ठाकरे यांची तुलना महान क्रिकेटपटून व्हिव्हियन रिचर्डस यांच्याशी केली आहे. ठाकरे कुटुंबाचे व्हिव्हियन रिचर्डस् तेजस उद्धव ठाकरे यांना जन्म दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा… असं या जाहिरातीत नार्वेकर यांनी म्हटलं आहे. तेजस यांचा क्रिकेटशी संबंध नसतानाही त्यांची व्हिव्हियन रिचर्डस यांच्याशी तुलना केल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

तेजस ठाकरे राजकारणात उतरणार?

पुढच्या वर्षी मुंबई महापालिकेच्या निवडणुका होत असल्याने शिवसेनेने जोरदार तयारी सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्याकडे महापालिका निवडणुकीची जबाबदारी देण्याचं आणि वरुण सरदेसाई यांच्यावर युवा सेनेचा भार देण्याची चर्चा शिवसेनेत सुरु असल्याची चर्चा आहे. तर तेजस ठाकरे हे राजकारणात सक्रिय होणार असल्याचे संकेत मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिले आहेत. त्यामुळे शिवसेना नव्या दमाच्या नेतृत्वाला सोबत घेऊन महापालिका सर करण्यासाठी डावपेच आखत असल्याचं स्पष्ट होत आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

एनसीबीने बॉलिवुड आणि ड्रग्सचा तपास केला नाही तर मुंबई पोलीस तपास करणार- गृहमंत्री

News Desk

आज होणाऱ्या मराठा आरक्षणाच्या बैठकीला उदयनराजेंनी फिरवली पाठ

News Desk

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी राज्य सरकार सज्ज, 1,367 कोटींची तरतूद!

News Desk