HW News Marathi
महाराष्ट्र

पावसाळ्यात मुंबईच्या होणाऱ्या ‘तुंबई’वरून नितेश राणेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र

मुंबई | पावसाळ्यात मुंबईची तुंबई होते अशीच मुंबईची ओळख मुंबई महापालिकेवर दिर्घकाळ सत्ता भोगणाऱ्या शिवसेनेनं करून ठेवेलीये, अशी टीका भाजपचे आमदार नितेश राणे यांनी शिवसेनेवर करत मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. या पार्श्वभूमीवर नितेश राणेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मुंबई महापालिकेच्या पावसाळ्यात होणाऱ्या दुर्वस्थेवर पत्र लिहिले आहे. यामुळे यंदाच्या पावसाळ्यात देखील मुंबईची काय परिस्थिती होईल याची कल्पना करत नाही, असे देखील त्यांनी पत्रकार म्हणले आहे.

नितेश राणे म्हणाले, “पावसाळ्यात मुंबईची तुंबई होते अशीच मुंबईची ओळख मुंबई महापालिकेवर दिर्घकाळ सत्ता भोगणाऱ्या शिवसेनेनं करून ठेवेलीये. आजतागायत या तुंबलेल्या मुंबईत अनेक मुंबईकरांनी आपले हकनाक जीव गमावलेत. नुसती मुंबईला ठेकेदारांच्या फायद्यासाठी रंगरंगोटी आणि देखावा करून गत वैभव प्राप्त होणार नाही. त्यासाठी जनतेच्या मुळ समस्येकडे लक्ष द्यावं लागेल. यावर्षी चांगल्या पाऊसाच्या शक्यता वर्तवल्या जात आहेत.त्यामुळे परत मुंबईची काय परिस्थिती असेल याची कल्पना करवत नाही.”

“तुंबणाऱ्या या मुंबईत ३८६ धोक्याचे ठिकाणं आहेत. ज्याला आपण फ्लडींग पाईंट म्हणतो. तिथे पाण्याचा उपसा करण्यासाठी पंप उपलब्ध करून देण्याच्या दिखाऊ कामापलिकडे आपण काय केले आहे?राज्य सरकार व पालिका प्रशासन यावर काही कायम स्वरूपी धोरण आखणार आहें का? नागरिकांना संभाव्य आपत्तीकाळात काय खबरदारी घेतली पाहिजे यावर काही जनजागरण केलं आहें का? या सर्व प्रश्नांची आपण समाधान साधणार आहात की नेहमीप्रमाणे मुंबईला तुंबई म्हणून देश व जागतिक स्तरावर बदनाम करणार आहात,” नितेश राणे म्हणाले.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भाजपच्या टोकाच्या जातीयवादाला धर्मनिरपेक्षवादाने उत्तर देवू – जयंत पाटील

News Desk

‘शाहरुख खानला आजही धमकावलं जातंय; त्याला सांगितलं जातंय की…’

News Desk

ठाकरे सरकारची पहिली विकेट, संजय राठोड यांनी दिला राजीनामा

News Desk