HW News Marathi
महाराष्ट्र

भाजप आमदाराकडून MIM च्या खासदाराचं कौतुक!

औरंगाबाद | माजी खासदार आणि शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आणि भागवत कराड यांच्यावर केलेल्या टीकेला आमदार प्रशांत बंब यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. चंद्रकांत खैरे हे भागवत कराड यांच्याशी कधीच बरोबरी करु शकणार नाहीत, अशी टोला बंब यांनी लगावला आहे. इतकंच नाही तर चंद्रकांत खैरे यांच्यावर टीका करताना बंब यांनी एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांचं कौतुक केलं आहे. त्यांचे आणि आमचे मतभेद असले तरी त्यांच्या कामाबाबत त्याचं कौतुक करावं लागे, असं प्रशांत बंब म्हणाले.

जे चांगलं काम करतात त्यांना चांगलं म्हणायला पाहिजे…

इम्तियाज जलील तरी एमआयएम पक्षाचे खासदार असतील तरी ते शहरात खैरे यांच्यापेक्षा काही विकासाची चांगली काम करत आहेत, हे आपण मानलं पाहिजे. जरी एमआयएम आणि आम्ही भविष्यातही विरोधक असू, पण जी चांगली काम आहेत त्याला चांगलं म्हणलं पाहिजे, असंही बंब म्हणाले.

चंद्रकांत खैरे यांचं औरंगाबाद शहरावर 30 वर्षे राज्य होतं. पण या 30 वर्षाच्या काळात त्यांनी औरंगाबाद शहर पूर्णपणे खिळखिळं करुन टाकलं. त्यांनी औरंगाबाद शहराची वाताहत केली. चंद्रकांत खैरे हे कधीच भागवत कराड यांची बरोबर करु शकणार नाहीत. औरंगजेबाच्या आधी मलिक अंबरने शहरासाठी चांगलं काम केलं होतं. आता दानवे आणि कराड हे दोघे मिळून शहराचा विकास करतील असा दावाही बंब यांनी केलाय. इतकंच नाही तर एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांचंही बंब यांनी कौतुक केलं आहे.

कराडांना मीच नगरसेवक केल, मी मोठा नेता

यावेळी त्यांनी केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड यांच्यावरही टीका केली. कराड यांना मीच नगरसेवक केलं. मीच त्यांना महापौर केलं. मी त्यांच्यापेक्षा खूप मोठा नेता आहे. त्यांची आणि माझी तुलना होऊ शकत नाही, असं ते म्हणाले. मराठवाडा हा शिवसेनेचा गड आहे. इथे भाजप यशस्वी होऊ शकणार नाही, असा दावाही त्यांनी यावेळी केला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

समीर वानखेडेंना हायकोर्टाचा दिलासा; कठोर कारवाई न करण्याचे राज्य सरकारला आदेश

News Desk

“फडणवीसांनी गुन्हेगारांना सरकारी आयोग, महामंडळाचं अध्यक्षपद का?” | मलिक

News Desk

विरोधकांना नेस्तनाबूत करण्यासाठी भाजप असे घाणेरडे डाव खेळतंय, ईडीच्या छाप्यावरुन कॉंग्रेसची प्रतिक्रिया 

News Desk