HW News Marathi
Covid-19

निलेश लंकेंचे कोव्हिड सेंटर आदर्श, भाजप आमदार श्वेता महालेंनी केलं कौतुक

अहमदनगर | कोरोनाच्या कठीण काळात राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके कोव्हिड सेंटर उभारले आहे. याचे कौतुक सर्व स्तरातून केले जात आहे. आता भाजपच्या आमदार श्वेता महाले यांनीही या सेंटरचे कौतुक केले आहे.

पारनेरचे राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांनी कोव्हिड सेंटर उभारुन कोरोनाग्रस्त रुग्णांना मोठा दिलासा दिला आहे. भाजप आमदार श्वेता महाले यांनी नुकतीच या कोव्हिड सेंटरला भेट दिली. यावेळी महाले यांनी लंकेंचं काम राज्यात आदर्शवत असल्याचं सांगत कौतुक केलं. भाजप आमदाराने राष्ट्रवादीच्या आमदाराचं कौतुक केल्याने सर्वत्र चर्चेला उधाण आलं आहे

काय म्हणाल्या श्वेता महाले ?

राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांनी अहमदनगरमधील पारनेर तालुक्यातील भाळवणी येथे कोव्हिड सेंटर उभारले आहे. भाजप आमदार श्वेता महाले यांनी त्याला भेट दिली. “आमदार निलेश लंके हे विधानसभेतील आमचा चांगले सहकारी आहेत. वैद्यकीय क्षेत्रातील अनुभव नसतानाही ते गेल्या दोन वर्षांपासून कोरोना काळात राज्यात आदर्श काम करत आहेत” अशा शब्दात श्वेता महाले यांनी निलेश लंके यांच्या कामाचं कौतुक केलं. विरोधीपक्ष भाजपच्या आमदार असताना सत्ताधारी राष्ट्रवादीच्या आमदाराचं कौतुक महालेंनी केल्यामुळे सर्वत्र चर्चेला उधाण आलं आहे.

निलेश लंके यांचं काम म्हणजे कौतुकास्पद

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके हे सध्या चर्चेचा विषय ठरलेले आहेत. पारनेरमध्ये उभारलेल्या कोविड सेंटरमध्ये आमदार निलेश लंके रात्रंदिवस रुग्णांच्या सेवेसाठी इथेच मुक्काम करत आहेत. निलेश लंके यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नावाने हे कोविड सेंटर उभारले आहे..आता याची महती संपूर्ण जगभरात पसरताना दिसत असून, जगभरातून मदतीचा हात या कोविड सेंटरसाठी पुढे केला जात आहे.

निलेश लंके यांनी उभारलेल्या 1 हजार 100 बेडच्या भव्य कोविड सेंटरमधील 100 बेडला ऑक्सिजनची व्यवस्था करण्यात आली आहे. या कोविड सेंटरला केवळ परदेशातून 1 कोटी 20 लाख रुपयांची आर्थिक मदत मिळाली आहे. निस्वार्थी भावनेने काम केलं तर हजारो हात देणारी असतात, असं मत निलेश लंके यांनी व्यक्त केलं.आतापर्यंत पॅरिस, दुबई, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, अमेरिका, फ्रान्स, जर्मनी, पोलंड आणि कॅनडा या देशातून आर्थिक मदत मिळाली आहे.

कोरोनाच्या पहिल्या लाटेत पाच हजाराहून अधिक लोकांनी मोफत उपचार घेऊन सुखरुप घरी परतले तर आता दुसर्‍या लाटेत 14 एप्रिलपासून सुरु केलेल्या या कोविड सेंटरमध्ये 2,500 लोक उपचार घेऊन घरी परतले आहेत. सध्या एक हजारांपेक्षा जास्त रुग्ण या कोविड सेंटरमध्ये उपचार घेत आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जॉन्सन अँड जॉन्सनने लसीच्या मानवी चाचण्या थांबवल्या

News Desk

खासगी रुग्णालयातील सिटी स्कॅनचे दर निश्चित – राजेश टोपे

News Desk

पुण्याच्या कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी अजित पवारांची बैठक; कडक निर्बंधावर होणार चर्चा

Aprna