HW Marathi
महाराष्ट्र राजकारण

मराठा आंदोलनकांवरील गुन्हे मागे घ्या, पत्राद्वारे संभाजीराजेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

मुंबई | आरे मट्रो कारशेडच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या पर्यावरण प्रेमी आणि नाणार येथील पेट्रोकेमिकल रिफायनरी विरोधात आंदोलनात करणाऱ्या स्थानिक ग्रामस्थांवरील गुन्हे मागे घेण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहे. मुख्यमंत्री पदी विराजमान झाल्यानंतर उद्धव ठाकरेंनी निर्णयाचा धडाका लावला आहे. आता भीमा कोरेगाव प्रकरणातील आंदोलकांवरचे गुन्हेही मागे घ्यावेत, अशी मागणी आता सुरू झाली आहे. त्यापाठोपाठ आता मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षण आंदोलकांवरील गुन्हे तत्काळ मागे घ्यावे, अशी मागणी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी केली आहे.

त्याचबरोबर कोल्हापुरातील ‘शिवाजी विद्यापीठासाहित’ महाराष्ट्रातील सर्वच सार्वजनिक स्थळांचे नामकरण हे ‘छत्रपती शिवाजी महाराज’ अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली असून यासंदर्भात संभाजीराजे यांच्या ट्विटर अकाऊंटवर त्यांनी हे पत्र शेअर केले आहे. मराठा समाजाच्या हितासाठी आंदोलन केले होते. आंदोलन करताना त्यांच्याकडून काही चुका घडल्या असतील तर त्या चुका जाणीवपूर्व केल्या नाहीत. त्यामुळे मराठा समाजातील तरुणांवरील गुन्हे मागे घेण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे संभाजीराजेंनी पत्राद्वारे केली आहे.

पत्रात नेमके काय म्हटले

“सर्व प्रथम मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्याबद्दल आपले अभिनंदन. माझे हे आपल्या नावे पहिलेच पत्र आहे. महाराष्ट्रातील जनमानसात छत्रपती शिवाजी महाराजांचे किती मोठे स्थान आहे, हे आपणास माहितच आहे. काही दिवसांपासून महाराजांच्या नाम उच्चारावरुन मोठी चर्चा होत आहे. मग ते अमिताभ बच्चन प्रकरण असो की केंद्रीय मंत्री रवी शंकर प्रसाद यांचे. त्या दोन्ही वेळी शिवभक्तांची बाजू घेत जाब विचारला होता.

यावर कायमस्वरुपी उपाय योजना करणे आवश्यक आहे. सुरुवात म्हणून आपण सार्वजनिक स्थळांचे नामविस्तार करणे आवश्यक आहे. ज्यांचे नाव ‘शिवाजी’ असे आहे. आपणास अजून एक विशेष विनंती की, मराठा आरक्षणाकरीता महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनता रस्त्यावर उतरुन लढली. त्यात अनेक ठिकाणी आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले. अनेक आंदोलकांवर विनाकरण गुन्हे नोंदवले गेले आहेत. मी माजी मुख्यमंत्र्यांनी याबाबत पत्र लिहून चर्चा केली होती. आपणास ही विनंती की, आपण उपरोक्त विषयांवर तत्काळ निर्णय घेऊन आदेश निर्गमित करावेत”.

 

 

Related posts

शिवसेनेच्या आमदारांची संपर्क करण्याची कुणाची हिंमत नाही !

News Desk

शिवसेना आजही आपल्या भूमिकेवर ठाम

News Desk

…म्हणुन मी राजीनामा दिला,राजीनाम्यानंतर संजय राठोड यांची पहिली प्रतिक्रिया 

News Desk