HW News Marathi
महाराष्ट्र

सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस आता ‘सावित्री उत्सव’ म्हणून ओळखला जाणार

मुंबई । राज्याच्या महिला व बालविकास विभागाने एक अत्यंत महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. एक परिपत्रक जारी करत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस म्हणजे ३ जानेवारी हा दिवस सावित्री उत्सव म्हणून ओळखला जाणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी दिली.

सावित्री बाई फुले यांचे विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावेत म्हणून राज्यभर ३ जानेवारी हा दिवस सावित्री उत्सव म्हणून साजरा करण्यात येणार आहे. सर्व अंगणवाड्या, कार्यालये यामध्ये सावित्री फुले यांच्या कार्याला परिचय करून देणाऱ्या विविध कार्यक्रमांचं आयोजन या दिवशी केले जाणार असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी दिली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबईतील वीजपुरवठा खंडित झाल्यामूळे मुख्यमंत्र्यांनी बोलावली तातडीची बैठक

News Desk

छत्रपती संभाजीनगरमध्ये वुमन-२० प्रारंभिक बैठकीला सुरुवात

Aprna

महाराष्ट्रात कोरोना बाधित रुग्णांपैकी सुमारे २९५ जण कोरोनामुक्त

News Desk