मुंबई | विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर सत्ता स्थापनेवरून शिवसेना-भाजपमध्ये सध्या राजकीय वातावरण तापले आहे. शिवसेना-भाजपकडून ऐकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू होत आहे. यात शिवसेनेचे ४५ आमदार आमच्या संपर्कात असून भाजपसोबत युतीचे सरकार स्थापन व्हावे, अशी त्यांची इच्छा असल्याचा दावा भाजप खासदार संजय काकडे यांनी एका वृत्तवाहिनीसोबत बोलताना केला आहे.
BJP MP Sanjay Kakade: 45 newly elected MLAs in Shiv Sena are in touch with Chief Minister & want alliance government to be formed. I think few of these 45 MLAs will convince Uddhav Thackeray and form government with Devendra Fadnavis as CM. I don't think there is any other option pic.twitter.com/RMvQlViqN9
— ANI (@ANI) October 29, 2019
राष्ट्रवादीमध्ये ज्याप्रमाणे गट तट आहेत, अजित पवार, छगन भुजबळ आणि जयंत पाटील यांना मानणारा वर्ग आहे, गट आहेत. त्याप्रमाणेच शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांना मानणारे काही आमदार आहेत. ते मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात आहेत. मुख्यमंत्री त्यांचा करा किंवा आमचे करा पण सत्तेत सहभागी करुन घ्या, अशी त्या आमदारांची भूमिका आहे, असे संजय काकडे म्हणाले.
“पुढील ५ वर्ष मीच मुख्यमंत्री पदावर राहणार,” असे धक्कादायक विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनौपचारिक गप्पांमध्ये वक्तव्य केले. मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यानंतर सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. यावर शिवसेवा पक्षप्रमुख संजय राऊत म्हणाले की, “मुख्यमंत्र्यांनी फणा काढून बोलण्याची गरज नाही,” अशी टीका त्यांनी केली. यानंतर राऊत यांनी आज (२९ ऑक्टोबर) ५०-५० फॉर्म्युला हा लोकसभेवेळीच ठरला असल्याचा दावा, राऊतांनी पत्रकार परिषदेत सांगितले. ठरल्याप्रमाणे मुख्यमंत्रीपद हा शिवसेनेचा हक्क, असे म्हणत त्यांनी भाजपला धमकी वजा इशारा दिला आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.