HW News Marathi
महाराष्ट्र

वैभववाडीत भाजपला खिंडार, ७ नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करणार

सिंधुदुर्ग | देशाचे गृहमंत्री अमित शहा हे सिंधुदुर्ग दौरा आटोपून दिल्लीत परतत नाहीत तोच सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजपला शिवसेनेने जोरदार धक्का दिला आहे. विशेष म्हणजे भाजप आमदार नितेश राणे यांच्या मतदार संघातच भाजपला खिंडार पाडण्यात शिवसेना यशस्वी ठरली आहे. वैभववाडी नगरपंचायतीतील भाजपच्या सात नगरसेवकांनी एकाचवेळी राजीनामा दिला असून हे सातही जण आपल्या हातावर शिवबंधन बांधणार आहे.

वैभववाडी नगरपंचायतीत १७ पैकी १७ नगरसेवक भाजपचे असून यातील ७ नगरसेवकांनी काल (८ फेब्रुवारी) तडकाफडकी आपल्या पदाचा राजीनामा दिला. रवींद्र रावराणे, संजय चव्हाण, संपदा राणे, रवींद्र तांबे, स्वप्निल इस्वलकर, संतोष पवार अशी या सात नगरसेवकांची नावे असून आणखी काही पदाधिकाऱ्यांनीही भाजपला रामराम ठोकला आहे. या नगरपंचायतीची निवडणूक लवकरच होणार असून त्याआधीच भाजपला मोठे खिंडार पडल्याने सगळीच गणितं बदलून गेली आहेत.

दरम्यान, आज वैभववाडी नगरपंचायतमधील सात राणे समर्थक नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश होत आहे. हे सर्व नेते भाजप आमदार नितेश राणे यांच्या वागण्याला कंटाळून शिवसेनेत प्रवेश करत आहेत, असा टोला विद्यमान शिवसेना नेते आणि आधी नारायण राणे यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे सतीश सावंत यांनी लगावला आहे. ते ‘टीव्ही ९ मराठी’ शी बोलत होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सातारातील बँक ऑफ महाराष्ट्रसह देशातील ७५ बँकांच्या डिजिटल बँकींग कार्यप्रणालीचे प्रधानमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

Aprna

अंजली दमानिया देणार छगन भूजबळांच्या सुटकेविरोधात हायकोर्टात आव्हान!

News Desk

हिंगणघाट जळीत कांड प्रकरणाचा घटनाक्रम

swarit