HW News Marathi
महाराष्ट्र

सुप्रिया सुळेंपाठोपाठ प्रफुल्ल पटेलांनी घेतली राज्यपालांची भेट, नितेश राणे यांनी केलं रिट्विट

मुंबई | राष्ट्रवादीच्या नेत्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या भेटीचा सपाटा लावला आहे. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंपाठोपाठ प्रफुल्ल पटेलांनीही राज्यपालांची भेट घेतली आहे. या भेटीवरुन भाजप नेते नितेश राणे रिट्विट केले आहे. इतकंच नाही तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही राज्यपालांना पत्र लिहिले आहे आणि आज ते त्यांची भेट घेणार आहेत. त्यामुळे राजकीय वर्तृळात सध्या चर्चांना उधाण आले आहे.

राज्यात कोरोना आणि मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून चर्चा सुरू असतानाच राष्ट्रवादीच्या महत्त्वाच्या दोन नेत्यांनी राज्यपालांची काही दिवसांच्या अंतराने भेट घेतली. या भेटींची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा होत असून, भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी प्रफुल्ल पटेल आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या भेटीचं ट्विट रिट्वट केल्यानं अनेकांनी भुवया उंचावल्या असून, तर्कविर्तक लावले जात आहेत.

राज्यातील करोना परिस्थितीत हळूहळू सुधारणा होत असली, तरी रुग्णासंख्या अजूनही चिंता वाढवणारी आहे. त्यातच मराठा समाजाला आरक्षण देणारा कायदा सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्यानं राज्यात दोन्ही मुद्द्यांवरून चर्चा सुरू आहे. यातच राष्ट्रवादींच्या नेत्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची घेतलेली भेट राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे.

राष्ट्रवादीच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी काही दिवसांपूर्वी राज्यपाल भगतसिंह यांची २ मे रोजी भेट घेतली होती. सुळे यांनी राज्यपालांची सदिच्छा भेट घेतल्याचं सांगण्यात आलं. मात्र, सुप्रिया सुळे यांच्या भेटीपाठोपाठ आता राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी राज्यपालांची भेट घेतली. पटेल आणि राज्यपालांमध्ये जवळपास तासभर चर्चा झाली.

मात्र, सुप्रिया सुळे यांच्या पाठोपाठ पटेल यांनी भेट घेतल्यानं या भेटींची चर्चा होत आहे. आश्चर्याची बाब म्हणजे भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी पटेल-राज्यपाल भेटीचं ट्विट रिट्विट केलं आहे. त्यामुळे या भेटी नेमक्या कशासाठी होतं आहे? अशी चर्चा आता जोर धरु लागली आहे.

दहा दिवसांत राष्ट्रवादीच्या दोन नेत्यांनी राज्यपालांची भेट घेतली आहे. दोघेही पक्षातील महत्त्वाचे नेते असल्याने या भेटीमागील कारण मात्र कळू शकलेलं नाही. राज्यपालांच्या या भेटीबद्दल पटेल यांच्याकडून अद्याप कोणतंही ट्विट करण्यात आलेलं नाही, मात्र राज्यपाल कार्यालयाच्या अधिकृत ट्विटर हँडलवर या भेटीची माहिती देण्यात आली. विशेष म्हणजे नितेश राणे यांनी भेटीचं रिट्विट केलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कुणी कितीही टरटर केली तरी आकाश काही फाटणार नाही, नवाब मलिकांचे राणेंना प्रत्युत्तर

News Desk

हा महाराष्ट्र आहे, गुजरात नाही ! मनसेने शिवसेनेला डिवचले

News Desk

IPL खेळाडूंना घेऊन जाणारी बस फोडली; मनसेचे पुन्हा ‘खळ्ळ खट्याक’ सुरू

Aprna