HW News Marathi
महाराष्ट्र

रक्षा खडसे यांचा भाजपच्या अधिकृत वेबासाईटवर आक्षेपार्ह उल्लेख

मुंबई | राज्यातील विरोधी पक्ष असणाऱ्या भाजपच्या अधिकृत वेबासाईटवरील एक गंभीर मुद्दा सध्या सोशल नेटवर्किंगवर चर्चेचा विषय ठरत आहे. रावेर विधानसभा मतदारसंघातील भाजपच्या खासदार रक्षा खडसे यांची पक्षाच्या वेबसाईटवरच चुकीची ओळख सांगत वादग्रस्त शब्दांमध्ये उल्लेख करण्यात आल्याचे स्क्रीनशॉर्ट व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणावर आता थेट राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली असून कारवाईचा इशारा दिला आहे.

भाजपच्या अधिकृत वेबसाइटवर महाराष्ट्रातील भाजप खासदार रक्षा खडसे यांचे असे अपमानजनक वर्णन पाहून मला धक्का बसला आहे. अशा प्रकारे महिलांचा अवमान करणाऱ्यांची महाराष्ट्र सरकार गय करणार नाही. भाजप आपण दोषींवर तत्काळ कार्यवाही करावी, अन्यथा महाराष्ट्र सायबर सेल पुढील कारवाई करेल,” असं देशमुख यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

काय आहे प्रकरण?

भाजपच्या अधिकृत वेबसाईटवर पक्षाच्या देशभरातील खासदारांची माहिती आहे. यामध्ये खासदाराचे नाव, फोटो आणि मतदारसंघाचा उल्लेख आहे. मात्र रक्षा खडसे यांच्या मतदारसंघाचा म्हणजेच रावेरचा उल्लेख करण्याऐवजी या वेबसाईटवर आक्षेपार्ह उल्लेख केलेला स्क्रीनशॉट सगळीकडे व्हायरल झाला. हा स्क्रीनशॉर्ट व्हायरल झाल्यानंतर आता तरी रक्षा खडसे यांच्या फोटोखालील हा उल्लेख काढून तेथे मतदारसंघाचं नाव टाकून चूक सुधारण्यात आल्याचे दिसत आहे. मात्र सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रावेरचं हिंदीमधील गुगल ट्रान्सलेशन चुकीच्या पद्धतीने करण्यात आल्यानं हा गोंधळ झाल्याचे सांगण्यात येत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“हे सोयीचं राजकारण…”, शरद पवारांच्या टीकेवर नारायण राणेंची प्रतिक्रिया

News Desk

“हॅलो, अजित पवार बोलतोय…”, आमदार निलेश लंकेंना अजित पवारांनी फोन करत दिला मोलाचा सल्ला

News Desk

नागपूर शहराच्या उपराजधानी दर्जाला लक्षात घेऊन भरीव निधी देणार! – अजित पवार

Aprna