HW News Marathi
महाराष्ट्र

मतदार ‘बिघाडी’च्या उमेदवाराला घरी बसविल्याशिवाय राहणार नाहीत | पंकजा मुंडे

औरंगाबाद | पदवीधर मतदारसंघाची जागा आपल्या हक्काची आहे, ती पुन्हा जास्तीत जास्त मताधिक्य घेऊन आपल्या ताब्यात आणण्यासाठी कसोशीने मेहनत घ्यावी लागेल. ‘तीन तिघाडी काम बिघाडी’ सरकारच्या उमेदवाराला मतदार घरी बसविल्याशिवाय राहणार नाहीत असा विश्वास व्यक्त करून राज्यात भाजपची सत्ता आणण्याची सुरवात शिरीष बोराळकर यांच्या विजयापासून करावी असे आवाहन भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी आज येथे केले.

मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे भाजपा महायुतीचे उमेदवार शिरीष बोराळकर यांच्या प्रचारार्थ तापडिया नाटयगृहात आयोजित बुथ कार्यकर्ता मेळाव्यात त्या बोलत होता. विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, भाजपचे ज्येष्ठ नेते हरिभाऊ बागडे, विजया रहाटकर, खासदार डाॅ. भागवत कराड आदी यावेळी उपस्थित होते.

पंकजा मुंडे म्हणाल्या, पदवीधर निवडणूक आपल्या हातात आलेली आहे, फक्त आपल्याला जास्तीत जास्त मताधिक्य कसे मिळेल याकडे लक्ष देणं आवश्यक आहे.आपला उमेदवार कर्मचाऱ्यांच्या नव्हे तर कार्यकर्त्यांच्या बळावर निवडणूक लढवत आहे. मतदानाच्या दिवशी प्रत्येकांनी फक्त आपापल्या बुथकडे लक्ष देऊन अधिकाधिक मतदान करून घ्यावे. जास्तीत जास्त मताधिक्य करून घेण्यासाठी कार्यकर्त्यांमध्ये स्पर्धा लागली ही चांगली बाब आहे परंतू तरीही ‘माझा युथ विजयी बुथ’ या धोरणाची प्रभावीपणे अंमलबजावणी करून बोराळकर यांना मताधिक्य द्यावे असं आवाहन त्यांनी केले.

हे सरकार आघाडीचे नव्हे तर बिघाडीचे !

‘तीन तिघाडी, काम बिघाडी’ अशी एक मराठीत म्हण आहे, तसं राज्यातील सरकारचं झालं आहे. भाजपने जन सामान्यांसाठी राबविलेल्या योजना बिघडविण्याचे काम हे सरकार सध्या करत आहे, त्यामुळे तिघाडीच्या उमेदवाराला मतदार घरी बसविल्याशिवाय राहणार नाहीत. सत्ता असो वा नसो सामान्य जनतेच्या हक्कासाठी लढण्याचे लोकनेते मुंडे साहेबांचे संस्कार असल्याने आम्ही अतिवृष्टीचा दौरा करून शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्याचे काम केले, त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या, शिक्षकांचे, पदवीधरांचे प्रश्न सोडवले, त्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांनी राज्यात पुन्हा भाजपची सत्ता आणण्याची सुरवात बोराळकर यांना विजयाचा गुलाल लावून करावी असे आवाहन करत पंकजा मुंडे यांनी केले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बीडमधील ‘त्या’ चार बालकांच्या मृत्यू प्रकरणी अखेर चार वाळूमाफियांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल!

News Desk

महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या आंबा महोत्सवात आग

swarit

राष्ट्रवादीचे राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी भररस्त्यात मंत्रालयबाहेर अंधारातच भरवला जनता दरबार..

News Desk