HW News Marathi
Covid-19

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीकरिता उद्या भाजपचे राज्यभरातील बँकांसमोर आंदोलन 

मुंबई | भाजप सोमवारी (२२ जून) राज्यातील विविध भागांतील बँकांसमोर “कर्जमाफी करा, पीक कर्ज द्या” आंदोलन करणार असल्याची माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. चंद्रकांत पाटील यांनी आज (२१ जून) याबाबतची अधिकृत घोषणा केली आहे. “राज्य सरकारची कर्जमाफी कागदावरच आहे. राज्यातील शेतकरी हवालदिल झाले आहेत. पावसाळा सुरु झाला तरीही खरीपासाठीचे शेतकऱ्यांचे कर्जवाटप अद्याप झाले नाही. हे ठप्प झालेले कर्जवाटप महाविकासआघाडी सरकारने तातडीने सुरु करावे. तसेच कर्जमाफी योजनेची अंमलबजावणी पूर्ण करावी”, या प्रमुख मागण्यांकरिता भाजपचे हे आंदोलन असणार आहे.

भाजपच्या या राज्यव्यापी आंदोलनाबाबत माहिती देताना चंद्रकांत पाटील म्हणाले, “राज्यात कधीही झाली नव्हती इतकी दयनीय अवस्था सध्या शेतकऱ्यांची आहे. जरी कोरोनाचे संकट असले तरीही पाऊस, खरीप हंगाम आणि शेतीची कामे थांबू शकत नाहीत. त्यामुळे गरज पडल्यास राज्य सरकारने स्वतः कर्ज उभारणी करून राज्यातील शेतकऱ्यांना पीककर्ज द्यावे आणि कर्जमाफीची अंमलबजावणी पूर्ण करावी, अशी आमची प्रमुख मागणी आहे. या मागणीसाठीच पक्षाचे कार्यकर्ते कोरोनासाठीचे सर्व नियम काटेकोरपणे पाळून राज्यातील विविध ठिकाणी असलेल्या बँकांसमोर आंदोलन करतील. त्याचप्रमाणे, यावेळी शेतकऱ्यांच्या सह्या घेऊन राज्य सरकारला एक निवेदन देखील आम्ही सादर करू.”

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राष्ट्रवादीच्या खासदार फौजिया खान यांना कोरोनाची लागण!

News Desk

पूरग्रस्त भागात लसीकरण वाढवणार, राजेश टोपेंची माहिती

News Desk

पुण्यात १३ जुलैपासून पुन्हा लॉकडाऊन, लवकरच नियमावली जारी करणार

News Desk