दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महाराष्ट्राचे आराध्यदैवत मानल्या जाणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ‘आज के शिवाजी -नरेंद्र मोदी’ असं पुस्तक आज प्रकाशित करण्यात आले असुन या पुस्तकाचे भाजपाच्या दिल्लीतील कार्यालयात प्रकाशन करण्यात आले आहे. या पुस्तकावरून आता देशात वादंग निर्माण झाले आहे. या पुस्तकाच्या विरोधात सोशल मीडियावर यावरून संताप व्यक्त केला जात आहे. तसेच या पुस्तकावर बंदी घालण्याची मागणीही केली जात आहे.
भाजपचे ज्येष्ठ नेते जय भगवान गोयल यांनी ‘आज के शिवाजी -नरेंद्र मोदी हे पुस्तक लिहिले आहे. आज भाजपाच्या दिल्लीतील कार्यालयात धार्मिक, सांस्कृतिक संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनामध्येचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी तुलना करणाऱ्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आलं आहे. या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभावेळी भाजपाचे दिल्लीचे अध्यक्ष मनोज तिवारींसह भाजपाच्या इतर नेत्यांची उपस्थिती होती. जय भगवान गोयल यांनी ट्विट करून या पुस्तक प्रकाशन सोहळ्याची माहिती दिली आहे.
आज @BJP4Delhi कार्यालय में आयोजित धार्मिक सांस्कृतिक सम्मेलन में मेरे द्वारा मा. श्री नरेन्द्र मोदी जी पर लिखि गई पुस्तक ‘‘आज के शिवाजी – नरेन्द्र मोदी’’ का विमोचन किया गया। @BJP4India @ManojTiwariMP @ShyamSJaju @MaheishGirri @blsanthosh @siddharthanbjp @JPNadda pic.twitter.com/VVCTQKdYFS
— Jai Bhagwan Goyal (@JaiBhagwanGoyal) January 11, 2020
भाजपच्याचं नेत्याने लिहिलेल्या या पुस्तकामुळे आता मोठा वाद निर्माण होण्याची चिन्हे आहेत. एकीकेडे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे छत्रपती शिवाजी महाराज हे आपले गुरू आहेत असं म्हणत असताना गुरूशी तुलना करणारे हे पुस्तक प्रकाशित
झाल्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी,भाजपचे महाराष्ट्रातील नेते त्याचपद्धतीने महाविकासआघाडीचे नेते आणि विविध संघटना नेमकी काय भुमिका घेतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.