HW News Marathi
महाराष्ट्र

‘भाजपकडून विधानसभा निवडणुकीची तयारी सुरु’, बावनकुळेंनी दिली माहिती

मुंबई | विधानसभा निवडणुकीची तयारी भाजपने आता पासूनच सुरु केलेली दिसून येत आहे. भाजपनं राज्यभर मिशन युवा मतदार सुरु केलं असून, २८८ विधानसभा मतदारसंघात प्रत्येक बूथवर भाजप १८ ते २५ वयोगटातील २५ युवा वॅारियर्स नेमणं सुरु केलं. म्हणजे भाजपनं यावेळेस ‘वन बूथ, २५ यूथ’च्या सूत्रानुसार काम सुरु केलं आहे. त्यामुळेच भाजप मध्यावधी निवडणुकीच्या तयारीला तर लागली नाही ना, अशी चर्चा सुरु झाली आहे. राज्यभरात भाजपचे 25 लाख ‘युवा वॅारीयर्स’ नेमण्याचं काम सुरु झाल्याचं, भाजपचे प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीर केलं आहे.

१८ ते २५ वयोगटातील युवा वॉरियर्स तयार

विधाबसभा निवडणुकीत भाजप कंबर कसून तयार होताना दिसत आहे. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, “आमची तयारी नेहमीच सुरु असते. पण १८ ते २५ वयोगटातील युवा वॉरियर्स तयार करण्याचं अभियान आम्ही हाती घेतलं आहे. हे अभियान यशस्वी होणार आहे. मी उत्तर महाराष्ट्र आणि पुण्याचा दौरा केला. जनतेमध्ये सरकारबद्दल प्रचंड नाराजी आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल आपुलकी आहे. युवा मोर्चा आमचा काम करत आहेच. पण युवा वॉरियर्स हे अभियान आम्ही आता सुरु केलं आहे. हा युवा मोर्चाचाच एक भाग आहे”.

“अरे बाबा तुला तिकीट मिळालं नाही, तू काय बढाई मारतो”

चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर शिवसेना नेते आणि पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी मागे हल्ला केला होता. ते म्हणाले, ” अरे बाबा तुला तिकीट मिळालं नाही, तू काय बढाई मारतो”, अशी खोचक टीका गुलाबराव पाटील यांनी केली होती. गुलाबराव पाटील म्हणाले, “चंद्रशेखर बावनकुळे यांची भाजपमध्ये लायकी नाही त्यांना तिकीट मिळत नाही. अरे बाबा तुला तिकीट दिलं नाही, तू काय बढाई मारतो. एकनाथ खडसे यांना तिकीट मिळालं नाही, पण खडसेंच्या मुलींला तिकीट दिलं. ओबीसी नेत्यांना संपवण्याचे काम भाजपमध्ये होत आहे. आधी आपली दुकानं पक्की करा, मगचं गुलाबराव पाटील यांच्यावर टीका करा.”

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अर्णब गोस्वामींविरोधात शिवसेनेचा हक्कभंग प्रस्ताव ! सभागृहात प्रचंड गोंधळ…

News Desk

“हा शेतकर्‍यांच्या ताकदीचा विजय आहे”- रविकांत तुपकर

News Desk

#CoronaVirus : मी मिसेस मुख्यमंत्र्यांचे ऐकतो, तुम्ही होम मिनिस्टरचे ऐका, मुख्यमंत्र्यांचा सल्ला

swarit