HW News Marathi
देश / विदेश

“राहुल गांधी न्याय मिळेपर्यंत तुमच्यासोबत असेल”, पीडितेच्या आईवडिलांना राहुल गांधींचं आश्वासन

नवी दिल्ली | दिल्लीत एक दुःखद घटना घडली आहे. दिल्लीत एका ९ वर्षाच्या मुलीची सामूहिक बलात्कार करून हत्या करण्यात आली. या घटनेनंतर दिल्लीत संताप व्यक्त होत असून, सामूहिक बलात्कार आणि हत्येनंतर पीडितेवर आईवडिलांच्या संमतीशिवाय अंत्यसंस्कार करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे राजकारण तापू लागलं आहे. दरम्यान, काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आज सकाळी पीडितेच्या कुटुंबियांची भेट घेतली. दिल्लीतील छावणी परिसरात असलेल्या गावात जाऊन राहुल गांधी यांनी कुटुंबियांना मदतीची ग्वाही दिली आहे.

न्याय मिळेपर्यंत राहुल गांधी तुमच्यासोबत असेल

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आज(४ ऑगस्ट) सकाळी पीडितेच्या कुटुंबियांची भेट घेतली. दिल्ली छावणी परिसरातील पीडितेच्या घरी जाऊन राहुल गांधी यांनी आईवडिलांसह कुटुंबियांची भेट घेतली. पीडितेच्या कुटुंबियांचं सांत्वन केल्यानंतर राहुल गांधींनी याबद्दल माहिती दिली. “मी पीडितेच्या कुटुंबियांशी बोललो, त्यांना न्याय हवाय. त्यांचं म्हणणं आहे की, त्यांच्यावर अन्याय केला जात आहे. त्यांची मदत करायला हवी. आम्ही मदत करू. मी त्यांना आश्वस्त केलं आहे की, न्याय मिळेपर्यंत राहुल गांधी तुमच्यासोबत असेल”, असं राहुल गांधी यांनी पीडितेच्या कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर सांगितलं आहे.

काय होतं प्रकरण?

दिल्लीतील छावणी परिसरातील नांगलगाव येथे मागास समाजातील एका नऊ वर्षीय मुलीची सामूहिक बलात्कार करून हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर दिल्लीतील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, धक्कादायक बाब म्हणजे पीडितेच्या आईवडिलांची परवानगी न घेताच घाईघाईत अंत्यसंस्कार करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. पीडितेच्या कुटुंबियांनी हा आरोप केला असून, या प्रकरणाने उन्नावमधील घटनेच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत. तर दुसरीकडे या प्रकरणावरून राजकारण तापताना दिसत आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ममता बॅनर्जी ५ मे रोजी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार!

News Desk

गुजरातमध्ये पतंगाच्या मांज्यामुळे गळा कापला जाऊन ६ जणांचा मृत्यू

News Desk

सुरक्षेतील त्रुटीनंतर मोदींनी घेतली राष्ट्रपतींची भेट

Aprna