HW News Marathi
महाराष्ट्र

“भाजपने आपले बिअर व वाईनरीचे कारखाने बंद करून पॅकबंद पाणी विकावे”

मुंबई | राज्य सरकारने मंत्रीमंडळाच्या बैठकीत झालेल्या निर्णयात किराणा मालाच्या दुकानात आणि सुपर मार्केटमध्ये वाईन विक्री करण्यास परवानगी दिली आहे. वाईन विक्रीतून मिळणारा महसूल वाढवण्याच्या दृष्टीने राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. मात्र, सरकारच्या या निर्णयानंतर राजकीय क्षेत्रातून विविध प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. अशातच विरोधी पक्ष भाजपने सरकारवर हल्ला चढवला आहे. तर आता राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपला जोरदार  प्रत्युत्तर दिलं आहे. 


राज्य सरकारने किराणा दुकानात व सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीसाठी परवानगी दिल्यानंतर भाजपने याला विरोध केला आहे. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते क्लाईड क्रास्टो यांनी भाजपवर टीका केली आहे. तुम्हाला विरोधच करायचा असेल तर भाजप नेत्यांनी आपल्या व कार्यकर्त्यांच्या मालकीचे वाईनरी आणि बिअरचे कारखाने बंद करून पॅकबंद केलेले पाणी विकावे, असा सल्ला क्लाईड क्रास्टो यांनी भाजपला दिला आहे.

सरकारच्या मॉल व सुपर मार्केटमध्ये वाईनच्या विक्रीला विरोध करणाऱ्या महाराष्ट्र भाजपच्या नेत्यांना क्लाईड क्रास्टो यांनी ट्वीटच्या माध्यमातून विरोध कसा कराल असा सल्ला दिला आहे. सरकारच्या निर्णयाला विरोध करण्याचा उत्तम मार्ग म्हणजे महाराष्ट्रातील तुमच्या सर्व भाजप कार्यकर्त्यांच्या मालकीचे वाईनरी आणि बिअरचे कारखाने बंद करून पॅक बंद पाणी विकण्याचा थेट सल्ला क्लाईड क्रास्टो यांनी ट्वीट करुन दिला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“आंदोलनजीवी म्हणत हिणवलेल्या शेतकऱ्यांचा अखेर विजय” – नाना पटोले

News Desk

“ST महामंडळाच्या खासगीकरणाचा कोणताही प्रस्ताव झालेला नाही!”

News Desk

“…अनेकदा अजित पवारांची मुख्यमंत्रीपदाची संधी हुकली”, फडणवीसांचा चिमटा

News Desk