HW Marathi
कोरोना महाराष्ट्र मुंबई राजकारण

धडकने लगा दिल, नजर झुक गई कभी उन से जब ‘सामना’ हो गया, – भाजपची राऊतांवर टिका

मुंबई | शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली. या भेटीनंतर सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या होत्या. राज्यपालांवर आगपाखड करणारे संजय राऊत आज राज्यपालांना का भेटले याची चर्चा सुरू झाली. आजच्या या भेटीमध्ये संजय राऊत यांनी भगतसिंग कोश्यारींना वाकून नमस्कार केला. संजय राऊत यांचा हा फोटो सोशल मीडियावर काही मिनिटांमध्येच व्हायरल व्हायला सुरूवात झाली. संजय राऊत यांच्या या फोटोवर आता भाजपने निशाणा साधला आहे.

धडकने लगा दिल, नजर झुक गई कभी उन से जब ‘सामना’ हो गया, असं ट्विट भाजपने त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन केलं आहे. या ट्विटसोबतच भाजपने संजय राऊत यांचा नमस्कार करत असल्याचा फोटोही शेयर केला आहे.

 

 

Related posts

पंतप्रधान मोदींनी ‘छोट्या’ भावाच्या हातात हात घालून घेतली मंचावर एन्ट्री

News Desk

वेळ आणीबाणीची, नागपूरकर देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी यांनाही डोळेझाक करता येणार नाही !

News Desk

‘स्वच्छ भारत अभियाना’साठी मुंबई पोलीस करणार पालिकेची मदत

News Desk