HW News Marathi
महाराष्ट्र

“घरात राहायला तुम्ही सांगत होता मग तुम्हीच…”,भाजप प्रवक्त्या मोदींवर भडकल्या

नवी दिल्ली | संपूर्ण देशात सध्या कोरोना महामारीमुळं अनेकांचे जीव धोक्यात आले आहेत. रोज लाखो लोकांना कोरोनाची लागण होत आहे. गेल्या २४ तासांत देशात ३ लाखांहून अधिक कोरोना रुग्ण आढळले. ही सर्वाधिक नोंद आहे. कोरोना इतक्या मोठ्या प्रमाणात वाढला असून पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीचे वारे जोरात वाहतंय यावरून भाजपा प्रवक्त्या पंतप्रधान नरेंद्र मोदींवर चांगल्याच भडकल्याचं दिसून आलं.

देशात कोरोनाचा स्फोट होत असताना पश्चिम बंगालमध्ये नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या मोठ्या गर्दीच्या सभा होत आहेत. यावरून भाजपा प्रवक्त्यांनी एका चॅनेलच्या शोवेळी स्वत:च्या पक्षाला घरचा आहेर दिला आहे.भाजपा प्रवक्त्या रितू रावत म्हणाल्या की, सुरक्षित अंतर ठेवा, घरात राहा. असं तुम्ही सांगत होता मग निवडणुका का घेतल्या? तुम्हीच हे पाळलं नाही.

गंगास्नान का करायला दिलं? ऑक्सिजन नसल्याने अनेकांचे जीव जातायेत. या पृथ्वीवर माणसं शिल्लक नसली तर निवडणुकीचा काय फायदा? सरकार बनवलं जाईल, निवडणुका होतील पण त्यासाठी एक वेळ द्या. मला भाजपा प्रवक्ते पदावरून काढलं तरी चालेल पण लोकं मरतायेत, औषधांची किंमत वाढतेय, मला याचा त्रास होतोय असं त्यांनी सांगितले.

काय म्हणाले होते नरेंद्र मोदी?

आपल्या घरातील लहान मुलांनी मोठ्या माणसांना स्वच्छता, अनुशासन यांचे महत्त्व पटवून दिले होते. घरातील मोठ्या माणसांनी बाहेर जाऊ नये, असा हट्ट धरला होता. पाचवी, आठवी, दहावीत असणाऱ्यांना परिस्थितीविषयीचे गांभीर्य जाणतेपणाने दाखवले होते. तेच आताही अपेक्षित आहे. बालमित्रांनी कोरोनाचे गांभीर्य पुन्हा एकदा पटवून द्यावे. घरात असे वातावरण तयार करा की, घरातील लोक विनाकारण, विनाकाम घराबाहेर पडता कामा नये. हा तुमचा बालहट्ट मोठे काम करू शकतो, असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लहानग्यांना आवाहन केले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाराष्ट्राचा आकडा १८९५, मुंबईत आढळले आणखी १३४ कोरोना पॉझिटिव्ह

News Desk

पंढरपूर निवडणूकीत मनसेचा राष्ट्रवादीला पाठिंबा, भगीरथ भालकेंचा करणार प्रचार

News Desk

कोरोनाची लागण झाल्यास त्याची व्याप्ती वाढू शकते मात्र घाबरण्याचे कारण नाही !

swarit