HW Marathi
महाराष्ट्र राजकारण

येत्या २७ ऑगस्टला होणार हर्षवर्धन पाटलांचा भाजपप्रवेश ? 

मुंबई | राज्यातील विधानसभा निवडणूक अवघ्या काहीच महिन्यांवर येऊन ठेपली असताना आता काँग्रेस-राष्ट्रवादीमधील अनेक ज्येष्ठ नेते, पदाधिकारी भाजप-शिवसेनेत प्रवेश करत आहेत. आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर इंदापूरच्या जागेवरून आता राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमध्ये संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हर्षवर्धन पाटील हे इंदापूरच्या जागेवरून लढण्यास इच्छुक आहेत. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस इंदापूरची जागा काँग्रेसकरिता सोडण्यासाठी तयार नाही. त्यामुळे हर्षवर्धन पाटील हे भाजपच्या संपर्कात असल्याची जोरदार चर्चा सध्या राजकीय वर्तुळाचे रंगत आहे.

इंदापूरमध्ये येत्या २६ ऑगस्ट रोजी इंदापूर काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडणार आहे. या मेळाव्यात हर्षवर्धन पाटील यांच्या भाजप प्रवेशाबाबत चर्चा होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्याचप्रमाणे, २७ ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश इंदापूरमध्ये येणार आहे. तेव्हा या महाजनादेश यात्रेतच हर्षवर्धन पाटील भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हर्षवर्धन पाटील हे सलग ४ वेळा इंदापूरच्या जागेवरून निवडून आले आहेत. परंतु, २०१४ साली झालेल्या विधानसभेत राष्ट्रवादीच्या दत्तात्रय भरणे यांनी हर्षवर्धन पाटील यांचा पराभव केला. याच पार्श्वभूमीवर यंदाच्या विधानसभेसाठी देखील राष्ट्रवादीकडून इंदापूर मतदारसंघावर दावा करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर हर्षवर्धन पाटील आता काँग्रेसला रामराम ठोकून भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे.

Related posts

आमच्यात आता मतभेद नाहीत, एकत्र येऊन रॅली काढावी ठाकरेंचे विरोधकांनी आव्हान

News Desk

महापौरांची गाडी ‘नो पार्किंग’ झोनमध्ये, दंडात्मक कारवाई ?

News Desk

मोदी हत्येचा कट रचणा-यांचा निषेध | आठवले

News Desk