HW News Marathi
महाराष्ट्र

राठोडांचा राजीनामा शिवसेना भवन किंवा मातोश्रीत फ्रेम करून ठेवला आहे का?, भाजपचा सवाल   

मुंबई | शिवसेना नेते संजय राठोड यांनी वन मंत्रीपदाचा राजीनामा देऊन ३ दिवस उलटले तरी राठोड यांचा अद्याप राज्यपालांकडे पाठवण्यात आलेला नाही. त्यावरून भाजप आमदार संजय कुटे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. राठोडांचा राजीनामा फक्त दिखाव्यापुरता आहे का? राठोडांचा राजीनामा शिवसेना भवन किंवा मातोश्रीत फ्रेम करून ठेवला आहे का? असा खोचक सवाल संजय कुटे यांनी केला आहे. संजय कुटे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राठोड यांच्या राजीनाम्यावरून थेट मुख्यमंत्र्यांनाच लक्ष्य केलं आहे.

राठोड यांनी मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा दिला आहे. परंतु, मुख्यमंत्र्यांनी हा राजीनामा अद्यापही राज्यपालांकडे पाठवलेला नाही. त्यामुळे राठोड हे अजूनही वनमंत्री आहेत. जोपर्यंत राठोडांचा राजीनामा राज्यपाल मंजूर करत नाहीत, तोपर्यंत राठोडांनी राजीनामा दिला असं म्हणता येणार नाही, असं सांगतानाच राजीनामा राठोडांकडे पाठवण्यासाठी इतके दिवस का लागत आहेत. मुख्यमंत्र्यांनी त्वरीत हा राजीनामा राज्यपालांकडे पाठवावा. त्यांचा राजीनामा मातोश्री किंवा शिवेसना भवनात फ्रेम करून ठेवला आहे का? असा सवाल कुटे यांनी केला आहे. जोपर्यंत राठोड यांचा राजीनामा राज्यपालांकडे जाऊन मंजूर होत नाही, तोपर्यंत आमची लढाई सुरूच राहिल. पूजा चव्हाणला न्याय मिळेपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही, असा इशाराही संजय राठोड दिला आहे.

मुख्यमंत्री काय म्हणाले होते?

शिवसेना नेते संजय राठोड यांनी रविवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन वन मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबतची माहितीही दिली होती. यावेळी त्यांना राजीनामा मंजूर केला का? असा सवाल करण्यात आला होता. तेव्हा त्यांनी, राजीनामा हा काय फ्रेम करून ठेवण्यासाठी नसतो, असं उत्तर दिलं होतं. तसेच राठोड यांच्या खात्याचा पदभार माझ्याकडेच आहे. त्यांच्या खात्याचा कार्यभार सध्या मुख्यमंत्री म्हणून माझ्याकडे आहे. अधिवेशनात त्यांच्या खात्याशी संबंधित काही प्रश्न आल्यास मी त्याला उत्तर देईन किंवा त्या खात्याचे राज्यमंत्री उत्तरं देतील, असंही त्यांनी सांगितलं होतं.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

विवा महाविद्यालयाची जागा आता कोरोनाच्या उपचारासाठी उपलब्ध

swarit

मंत्रिमंडळाच्या बैठकीत महाविकासआघाडी सरकारने घेतले ‘हे’ महत्त्वाचे निर्णय

Aprna

धुळे-नगर महापालिका निवडणुकांचे निकाल आज

News Desk