HW News Marathi
महाराष्ट्र

न्यायालयाच्या निर्णयाला षड्यंत्र म्हणणे हा न्यायालयाचा अपमान, संजय राऊत यांच्यावर कारवाई करण्याची भाजपची मागणी

मुंबई | मुंबई उच्च न्यायालयाने कांजूरमार्ग मेट्रो कारशेडच्या कामाला तात्काळ स्थगिती दिल्याने ठाकरे सरकारला मोठा धक्का बसला आहे. कोर्टाच्या या निर्णयावरु शिवसेना खासदार संजय राऊत आक्रमक झालेले पाहायला मिळाले आहेत. संजय राऊत यांनी उच्च न्यायालयाच्या निर्णयाला षडयंत्र म्हटल्याने भाजप आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली आहे. “कांजुरमार्ग जमीन वाद – राऊत म्हणतात, मोठं षडयंत्र! न्यायालयाच्या निर्णयाला षड्यंत्र म्हणणे हा न्यायालयाचा अपमान (contempt of court) असून याविरुद्ध संजय राऊत यांच्यावर कारवाई व्हावी”, अशी मागणी भाजपकडून केली जात आहे.

तर दुसरीकडे विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनीही “संजय राऊत यांची वक्तव्ये बेताल आणि बेजबाबदार आहेत. आज तर थेट न्यायालयाने काय केलं पाहिजे हेच ते सांगत आहेत. राऊतांवर कायदेशीर कारवाई व्हायला हवी” असं प्रविण दरेकर म्हणाले. ते टीव्ही 9 मराठीशी बोलत होते.

काय म्हणाले संजय राऊत?

मेट्रो कारशेडसाठी कांजूरच्या जमिनीच्या वापरावरुन उच्च न्यायालयानं महाविकास आघाडी सरकारचा दणका दिला आहे. हा निर्णय दुर्दैवी असल्याचं मत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केलं आहे. ही जमिन महाराष्ट्राची, सरकार महाराष्ट्राचं, मग हे मिठागरवाले आले कुठून? असा सवाल संजय राऊत यांनी विचारला आहे. ‘कांजूरच्या जागेवर कुणी राजकारणी बंगले किंवा फार्महाऊस बांधणार नाहीत. हा मुंबई, महाराष्ट्र आणि पर्यायानं देशाच्या विकासाचा विषय आहे. काल उच्च न्यायालयाने दिलेला निर्णय दुर्दैवी आहे. याच जमिनीवर मागील सरकार पोलिसांसाठी, गरीबांसाठी घरं बांधणार होतं. मग आता ही जमिन सरकारची नाही का? अशाप्रकारच्या प्रकल्पाला विलंब होईल अशी परिस्थिती निर्माण करायची, लोकांमध्ये रोष निर्माण करायचा आणि सरकारला बदमान करायचं, हे काम सध्या सुरु आहे,’ अशी टीका संजय राऊत यांनी भाजपवर केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

साप चावल्यानं मुलीचा झोपेतच मृत्यू

News Desk

गुरुपौर्णमेनिमित्त पंकजा मुंडे यांनी त्यांच्या गुरूंचे केले स्मरण

News Desk

औरंगाबादमध्ये २ नवे कोरोना पॉझिटिव्ह, शहराची संख्या २० वर

News Desk