मुंबई | राज्यात सध्या एकच विषय मोठ्या प्रमाणात गाजत आहे तो म्हणजे पूजा चव्हाण या तरुणीच्या आत्महत्येचा आणि त्यात समोर आलेल्या नावाची चर्चा त्याहून अधिक होत आहे. शिवसेना नेते आणि वनमंत्री संजय राठोड यांचं या प्रकरणात नाव आलं आणि राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपने शिवसेनेवर, सरकार टीकेची झोड उठवली. नुकतचं, राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांचं रेणू शर्मा प्रकरण ताजं असतानाच शिवसेनेच्या नेत्याचं नाव पुढे येणारं आणखी एख प्रकरण समोर आल्याने भाजपच्या हातात आयतं कोलीतचं मिळालं. आता पुन्हा एकदा भाजपने शिवसेनेवर मुख्यत: शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
‘महाभारतात होते त्या संजय इतक्याच दुरदृष्टीचे दुसरे संजय आपल्याकडे आहेत. ते जगातल्या सगळ्या गोष्टींबाबत ग्यान देत असतात. पण वनमंत्री संजय राठोड यांच्याबाबत त्यांनी काहीही लिहिलं वा बोलले नाहीत. काय करणार नावबंधू म्हटल्यावर घ्यावं लागतं सांभाळून’, असे खोचक ट्विट भाजप महाराष्ट्रच्या पेजवरुन केले आहे. इतकंच नाही तर, ‘एका संजयची बाजू दुसरा संजय पूर्णपणे सांभाळून घेत आहे. ऐरवी नको त्या विषयावरही सामनातून खरडत बसणारे संजय राऊत यांना संजय राठोडबद्दल काही लिहायला सुचत नाही की त्यांच्या पेनाची शाई संपली आहे?’, असा सवालही यावेळी भाजपने उपस्थित केला आहे.
दरम्यान, संजय राऊत शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनातून काय केंद्र सरकारवर, भाजपवर टीका करत असतात. मात्र, संजय राठोड प्रकरणावर त्यांनी काहीही भाष्य न केल्याने भाजपने राऊत यांना चांगलेच कोंडीत पकडले आहे. तसेच, आज (२४ फेब्रुवारी) संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला तेव्हा त्यांनी काल पोहरादेवी येथे संजय राठोड यांच्या उपस्थित जो गर्दीचा लोट आला होता त्यावर बोलत योग्य ती कारवाई होईल असे सांगितले होते.
एका संजयची बाजू दुसरा संजय पूर्णपणे सांभाळून घेत आहे. ऐरवी नको त्या विषयावरही सामनातून खरडत बसणारे संजय राऊत यांना संजय राठोडबद्दल काही लिहायला सुचत नाही की त्यांच्या पेनाची शाई संपली आहे? @rautsanjay61 @SanjayDRathods @SaamanaOnline pic.twitter.com/zRJsync4qd
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) February 24, 2021
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.