मुंबई। भाजपने देशात बनावट हिंदू हृदयसम्राट बनवण्याचा प्रयत्न केला. परंतु, भाजपचा तो प्रयत्न फसला, असा टोला राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपला लगावला आहे. मुख्यमंत्र्यांनी आज (१० एप्रिल) कोल्हापूरच्या पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संबोधित करत होते.
मुख्यमंत्री म्हणाले, “भाजपने देशात बनावट हिंदू हृदयसम्राट बनवण्याचा प्रयत्न केला. परंतु, भाजपचा तो प्रयत्न फसला. त्यांना लोकांनी झिडकारले असून हिंदूहृदयसम्राट म्हटले तर फक्त एकच नाव समोर येते ते म्हणजे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे. याशिवाय दुसरे कोणतही नाव समोर येऊ शकत नाही. त्यांनी कितीही प्रयत्न केले, तरी ते होऊच शकत नाही. हिंदू अडचणी होते, तेव्हा कोणतीही पर्वा न करता मदतीला धावून जाणारे म्हणजे हिंदूहृदयसम्राट होते. तेव्हा त्यांनी घरी बसून लोकांना माध्यमांतून प्रतिक्रिया दिली नाही. आणि प्रतिक्रिया सम्राट होऊ शकतात पण, हिंदुहृदयसम्राट होऊ शकत नाही.”
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.