HW News Marathi
महाराष्ट्र

दुसऱ्यांच्या मुलांचं बारसं करण्याची शिवसेनेला सवयच – राणे

मुंबई । केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना डिवचलं आहे. “दुसऱ्यांच्या मुलाचं बारसं करण्याची शिवसेनेला सवयच आहे”, असा टोला नारायण राणेंनी लगावला आहे. शिवसेनेला दादरा नगर हवेली लोकसभा पोटनिवडणुकीत मोठा विजय मिळाला. त्यानंतर महाराष्ट्राच्या बाहेरही आम्ही जिंकलो असं म्हणत शिवसेनेने भाजपला डिवचायला सुरुवात केली. याच पार्श्वभूमीवर, आता नारायण राणे यांनी शिवसेनेवर जोरदार निशाणा साधला आहे.

“मी काहींचे फटाके ऐकत होतो. संजय राऊतांचे अग्रलेख दोन दिवसांपासून वाचत होतो. देशात पोटनिवडणुका झाल्या. एक जागा अपक्ष उमेदवार जिंकला. शिवसेनेने डंका सुरू केला की, आम्ही महाराष्ट्राच्या बाहेर जिंकलो. म्हणून, मी मुद्दामहून त्या विजयी उमेदवाराची निशाणी मागवून घेतली. तर त्या उमेदवाराची निशाणी बॅट घेऊन उभा असलेला फलंदाज अशी होती. पण दुसऱ्यांच्या मुलांचं बारसं करण्याची शिवसेनेला सवयच आहे”, असा बोचरा टोला राणेंनी लगावला.

“संजय राऊत डोक्याविना दिसतील” – राणे

नारायण राणेंनी पुढेही संजय राऊतांवर निशाणासाधला. “जे रात्री करायचं ते दिवसा केल्याने राऊतांना लिखाण करताना भान राहत नाही वाटतं. आम्ही ३०३ पेक्षा अधिक आणि तुम्ही एकने धडक मारणार? दिल्लीला धडक मारायला आल्यावर जागेवर डोकं राहणार नाही. संजय राऊत डोक्याविना दिसतील”, असं नारायण राणे म्हणाले. पुढे मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधताना राणे म्हणाले, “युती केली आणि नंतर गद्दारी करून मुख्यमंत्रीपद मिळवलं. मुख्यमंत्री काय बोलतात ते कळत नाही. पत्रकारांना कसं कळतं? चौफेर फटकेबाजी म्हणून सांगता?”

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

दिवाळीच्या दिवशीही सुट्टी न घेता समर्पित भावनेने अधिकारी व कर्मचारी काम करणार

Aprna

बलात्काराच्या आरोपांनंतर धनंजय मुंडेंनी पहिल्यांदाच सोडलं मौन

News Desk

सांगलीचे महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनी घेतली शरद पवारांची भेट

News Desk