HW Marathi
महाराष्ट्र मुंबई राजकारण

“…तोपर्यंत महाविकासआघाडी सरकारला कोणताही धोका नाही”, राष्ट्रवादीच्या नेत्याचा मोठा दावा

Mahavikas Aghadi

मुंबई | राज्यातील तीन पक्षांचे असलेले सरकार पाडण्याचा विरोधी पक्षाचा प्रयत्न सुरु आहे. मात्र, तो पुर्ण होणार नसल्याची दावा महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांकडून वारंवार केला जात आहे. यावर राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांनी भाष्य केले आहे. राज्यातील महाविकासआघाडीचे सरकार पाडण्यासाठी देवेंद्र फडणवीस बरेच प्रयत्न करत आहेत. मात्र, शरद पवार, सोनिया गांधी आणि उद्धव ठाकरे एकत्र असेपर्यंत महाविकासआघाडीचे सरकार पडणार नाही, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी केला.

मात्र, हसन मुश्रीफ यांनी आज (४ मे) मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना हे सर्व दावे फेटाळून लावले. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्याच्या पहिल्या दिवसापासून भाजपकडून हे सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र त्यांच्या प्रयत्नांना यश येणार नाही. जोपर्यंत शरद पवार, सोनिया गांधी आणि उद्धव ठाकरे हे एकत्र आहेत, तोपर्यंत सरकारला काही होणार नाही. महाविकास आघाडीचं हे सरकार पुढील 25 वर्ष चालेल, असे हसन मुश्रीफ यांनी म्हटले.

पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत महाविकासआघाडीचा पराभव हा लोकांच्या नाराजीमुळे झालेला नाही. तर याठिकाणी रणनीती आखण्यात महाविकासआघाडी थोडीशी कमी पडली. भगीरथ भालके यांच्याऐवजी त्यांच्या आईला उमेदवारी दिली असती तर काम सोपं झालं असतं. मात्र, आम्ही हा निकाल स्वीकारला आहे, असे हसन मुश्रीफ यांनी सांगितले आहे.

Related posts

शरद पवारांचे ‘ते’ ट्विट, संजय राऊतांकडून ‘रिट्विट’

News Desk

कॉग्रेसच्या आंदोलनामुळे मंत्रालयासमोर कडक पोलिस बंदोबस्त

News Desk

औरंगाबादमध्ये ४८ तास इंटरनेट सेवा रहाणार बंद

News Desk