मुंबई | मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत शिवसेनेला शह देण्यासाठी भाजपकडून जोरदार तयारी सुरू असल्याचं दिसून येत आहे. नुकतंच सत्ताधारी शिवसेनेने मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प सादर केला आहे. तर आता भाजपनेही महापालिकेवर आपली सत्ता आणण्यासाठी जोरदार रणनीती आखायला सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर नुकतीच भाजपच्या २५ समित्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर भाजप नेते व आमदार आशिष शेलार यांच्याकडे विशेष जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. भाजपचे मुंबई अध्यक्ष मंगल प्रभात लोढा यांनी काल (४ फेब्रुवारी) रात्री उशिरा यासंदर्भात माहिती दिली आहे. या निवडणूक संचालन समितीमध्ये खासदार गोपाळ शेट्टी, पूनम महाजन, मनोज कोटक आणि किरीट सोमय्या हे विशेष निमंत्रक असतील तर आमदार राहुल नार्वेकर, कालिदास कोळंबकर, नितेश राणे आणि प्रकाश मेहता हे सदस्य असतील, असे त्यांनी स्पष्ट केले.
निवडणूक संचालन समिती
अध्यक्ष : आमदार ऍड आशिष शेलार
सदस्य : आमदार कालिदास कोळंबकर, माजी आमदार प्रकाश मेहता, आमदार राहुल नार्वेकर, आमदार नितेश राणे
जाहिरनामा समिती
अध्यक्ष : खासदार पूनम महाजन
सदस्य : आमदार योगेश सागर, आमदार सुनील राणे, आमदार राजहंस सिंह, आर.यु. सिंह, महापालिका गटनेते प्रभाकर शिंदे
प्रशासन समन्वय : विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आमदार प्रविण दरेकर
प्रसार माध्यम व समाज माध्यम समिती
अध्यक्ष : आमदार अतुल भातखळकर
सदस्य : आमदार राम कदम, अमरजीत मिश्रा, ऍड विवेकानंद गुप्ता
झोपडपट्टी संपर्क सामिती :
खासदार गोपाळ शेट्टी, आर.डी. यादव, तृप्ती सावंत
संसाधन : खासदार मनोज कोटक
आरोपपत्र समिती
अध्यक्ष: आमदार अमित साटम
सदस्य : भालचंद्र शिरसाट, विनोद मिश्रा
बाह्य प्रसिध्दी समिती
आमदार पराग अळवणी
प्रसिध्दी सामुग्री व्यवस्थापन समिती
आमदार मिहिर कोटेचा आणि आमदार पराग शाह
बुथ संपर्क
संजय उपाध्याय
निवडणूक आयोग संपर्क :
प्रकाश महेता आणि कृपाशंकर सिंह
ज्येष्ठ कार्यकर्ता संपर्क : आमदार भाई गिरकर
वॉर रुम
प्रतिक कर्पे
ओबीसी संपर्क समिती
आमदार मनिषा चौधरी
उत्तर भारतीय संपर्क समिती
जयप्रकाश ठाकूर, आर.यू.सिंह, अमरजित सिंह, जयप्रकाश सिंह, ज्ञानमूर्ती शर्मा
व्यापारी व छोटे व्यावसायिक संपर्क समिती
राज पुरोहित
दक्षिण भारतीय संपर्क समिती
आमदार कॅप्टन सेल्वन
श्रमिक संपर्क (असंघटीत)
हाजी अराफत शेख
विशेष संपर्क समिती
आमदार विद्या ठाकूर आणि आचार्य पवन त्रिपाठी
अनुसूचित जाती मोर्चा संपर्क समिती
शरद कांबळे
अल्पसंख्यांक संपर्क समिती
वसीम खान
नव मतदार संपर्क समिती
तेजिंदर सिंग तिवाना, पल्लवी सप्रे, आरती पुगांवकर
महिला संपर्क समिती
शलाका साळवी आणि शीतल गंभीर
प्रवासी कार्यकर्ता समिती
संजय पांडे
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.