मुंबई | नुकतंच मुंबई महानगरपालिकेचा यंदाचा अर्थसंकल्प सादर सादर करण्यात आला आहे. सन २०२२-२३ या आर्थिक वर्षासाठी हा अर्थसंकल्प असून, हा अर्थसंकल्प आतापर्यंतच्या पालिकेच्या इतिहासातील सर्वांत मोठा अर्थसंकल्प असल्याचं म्हंटलं जात आहे. मात्र, मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर आता भाजपने या अर्थसंकल्पावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत ठाकरे सरकारवर हल्ला चढवला आहे.
भाजपचे मुंबई महानगरपालिका गटनेते प्रभाकर शिंदे, पक्षनेते विनोद मिश्रा आणि आमदार राजहंस सिंह यांनी आज (५ फेब्रुवारी) मुंबईत पत्रकार परिषद घेत अर्थसंकल्पावर टीका केली आहे. यावेळी त्यांनी पालिकेचा अर्थसंकल्प हा फसवा आणि मुंबईकराची दिशाभूल करणारा असल्याचं म्हंटलं आहे.
आयुक्तांनी सभागृहाचं अपमान केला – प्रभाकर शिंदे
पालिकेचा बजेट हा मुंबईकरांची दिशाभूल करणारा आहे. या बजेट मध्ये आयुक्तांनी म्हटलं की कोणतीही कर वाढ नाही. मात्र, नंतर पत्रकार परिषदेत म्हटलं की निवडणुकीनंतर मालमत्ता करात वाढ करू असंही त्यांनी म्हटलं आहे. आयुक्तांनी कर वाढवण्याबाबत सभागृहात कोणताही सूतोवाच केला नव्हता. आयुक्तांनी सभागृहाचं अपमान केला आहे. त्यामुळे आयुक्तांच्या कोणत्याही प्रयत्नांना भाजप विरोध करणार, असं भाजप गटनेते प्रभाकर शिंदे यांनी म्हंटलं आहे. तसेच या अर्थ संकल्पात आकडे वाढवून दिले आहेत, असंही त्यांनी यावेळी सांगितलं. याशिवाय आयुक्तांनी आणि सेनेने मुंबईकरांच्या पाठीत खंजीर खुपसला आहे, असा आरोप त्यांनी केला आहे. कोविडच्या नावावर सत्ताधाऱ्यांनी गरिबांची लुट केली आहे, असा आरोपही प्रभाकर शिंदे यांनी केला.
आयुक्तांनी मुंबईच्या जनतेचा विश्वास घात केला – राजहंस सिंह
मुंबईच्या जनतेसोबत आयुक्तांनी विश्वास घात केला आहे. मालमत्ताकराचा बजेट मध्ये उल्लेख नाही. दुसऱ्या दिवशी पत्रकार परिषद घेऊन सांगितले जाते, असे भाजप आमदार राजहंस सिंह यांनी म्हंटले आहे. बाळासाहेब ठाकरे आरोग्य योजना ही जुनीच योजना आहे. आपली चिकित्सा ही योजना दोन वर्षापूर्वी त्याच आता नामकरण केले. कोविड च्या नावावर सत्ताधाऱ्यांनी लुटले आहे. शिवसेनेला आता कळलं आहे कि आता जनता याना पालिकेत ठेवणार नाही म्हणून आधीच लूट करून घेत आहेत. तसेच आता पालिकेवर भाजपची सत्ता येणार आहे, असा दावाही त्यांनी यावेळी केला आहे.
शिवसेना जुन्याच योजना पुन्हा आणत आहेत ही आश्वासनाची खेरात आहे. उदघाटन करून मुंबईकरांच्या पदरी काय पडणार आहे ? अशी टीका सवाल प्रभाकर शिंदे यांनी आदित्य ठाकरेंवर केली आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.